फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
IND vs ENG Possible Playing 11 : २०२६ च्या T20 विश्वचषकातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना ५ मार्च रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ या ‘करो या मरो’ स्पर्धेत विजयासाठी झुंजतील. जिंकणारा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना करेल, तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. भारताच्या संघाने सुपर 8 च्या सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी केली पण अजूनही भारतीय संघाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी या सामन्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात.
भारताचा सलामीवीर फलंदाज मागील काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी करत आहे. विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये तो शून्यावर बाद झाला आहे, त्यानंतर त्याने आतापर्यत सेमीफायनलच्या आधीच्या सामन्यापर्यत फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. अभिषेक शर्माला प्लेइंग ११ मधून वगळले जाऊ शकते.
अभिषेक शर्माने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये विशेष चांगली कामगिरी केलेली नाही. सहा सामन्यांमध्ये तो तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने त्याच्या सहा डावांमध्ये ०, ०, ०, १५, ५५ आणि १० धावा केल्या आहेत. परिणामी, तो उपांत्य फेरीपूर्वी बाद होऊ शकतो. अभिषेकची जागा संजू सॅमसन आणि इशान किशन घेऊ शकतात. मागील सामन्यात संजूने शानदार ९७ धावा करून भारताला सामना जिंकण्यास मदत केली. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
In it to win it! 🤩🚀⏳ With a ticket to the final on the line, which team takes the win tonight? ICC Men’s #T20WorldCup Semi-Final 2 👉 #INDvENG | THU, 5 MAR, 5:30 PM pic.twitter.com/t2OCR5PQZb — Star Sports (@StarSportsIndia) March 5, 2026
तिलक वर्मा यांनाही चौथ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि रिंकू सिंग खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करू शकतात. भारतीय संघ व्यवस्थापन अभिषेक शर्माच्या जागी रिंकू सिंगला अंतिम अकरामध्ये समाविष्ट करू शकते. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे सोपवण्यात येईल. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे सोपवण्यात येईल. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या दोन्ही खेळाडूंना साथ देऊ शकतात.
संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.






