सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. इंडस्ट्रीमध्येही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच आणखी एका कपलचं लग्न झालं आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री लग्नगाठ बांधत आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करतेय.
Reshma And Pawan Wedding

सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू असताना, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रेश्मा शिंदेही लग्नबंधनात अडकली आहे. तिने तिच्या लाईफपार्टनरसोबत सप्तपदी घेतल्या आहे.

अभिनेत्रीने २९ नोव्हेंबरला लाईफ पार्टनर पवनसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली असून तिने काही तासांपूर्वीच चाहत्यांसोबत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर रेश्माने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करताना “आयुष्याची नवीन सुरुवात...” असं कॅप्शन दिलं आहे. यापुढे अभिनेत्रीने इन्फिनिटी, लव्ह आणि नजरेचा इमोजी दिला आहे.

लग्नासाठी रेश्माने गुलाबी रंगाची सुंदर बनारसी नऊवारी साडी नेसली आहे. तर, पवनने लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि धोतर परिधान केले आहे. रेश्मा- पवनच्या लग्नातील फोटोंवर इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रेश्मा शिंदेचं हे दुसरं लग्न आहे. अभिनेत्रीने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर रेश्माने पूर्णवेळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं होतं. तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.






