Retinol Deficiency Food: रेटिनॉल हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, त्याला सामान्य भाषेत विटामिन ए असे म्हणतात. जर विटामिन ए वा रेटिनॉलची कमतरता असेल तर दृष्टी कमी होऊ शकते. यामुळे रातांधळेपणा होऊ शकतो, हा आजार ज्यामध्ये पीडित व्यक्तीची रात्रीच्या वेळी दृष्टी कमी असते. आपल्या शरीरात रेटिनॉल आपोआप तयार होत नाही. यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन ए मुबलक असलेले काही पदार्थ खावे लागतील. डॉक्टर माधव भागवत यांनी काही पदार्थ सांगितले आहेत, जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
रेटिनॉलची कमतरता डोळ्यांची दृष्टी रात्रीच्या वेळी कमी करते आणि त्यामुळे तुम्हाला रातांधळेपणा येऊ शकतो. कोणत्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही हा त्रास कमी करू शकता जाणून घ्या
फिश ऑइल ज्याला कॉड लिव्हर ऑइल असेही म्हणतात हे रेटिनॉलचा समृद्ध स्त्रोत आहे. जर तुम्ही एक चमचा कॉड लिव्हर ऑइल खाल्ले तर तुम्हाला 4,080 एमसीजी व्हिटॅमिन ए मिळेल. याशिवाय हे तेल ओमेगा -3 फॅटी अॅसिडचा समृद्ध स्रोत देखील मानले जाते
रताळे तुम्हा उपवासाला खायला नक्कीच आवडत असतील. जर तुम्ही मध्यम आकाराचे उकडलेले रताळे खाल्ले तर तुम्हाला 1,403 mcg retinol मिळेल जे दैनंदिन गरजेच्या 156 टक्के आहे. दुधात मिसळूनही रताळे तुम्ही खाऊ शकता
गाजर ही साधारणपणे हिवाळ्यातील भाजी असते, पण आजकाल ती प्रत्येक ऋतूत गाजर बाजारात मिळते. जर तुम्ही अर्धा कप कच्चे गाजर खाल्ले तर तुम्हाला 459 Mcg Vitamin A मिळेल, जे रोजच्या गरजेच्या 51 टक्के आहे
चवळी सामान्यत: प्रथिनांचा एक समृद्ध स्रोत मानला जातो, परंतु त्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन ए देखील आहेत. डोळ्यांव्यतिरिक्त, हे आपल्या हृदयासाठीदेखील फायदेशीर आहे आणि यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोकादेखील कमी होतो
पालक ही एक हिरवी पालेभाजी आहे ज्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही अर्धा कप उकडलेले पालक खाल्ले तर तुम्हाला 573 mcg व्हिटॅमिन ए मिळेल, जे रोजच्या गरजेच्या 64 टक्के आहे