फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्षातील तिसरा आठवडा ( 19 ते 25 जानेवारी) पर्यंत असणार आहे. या आठवड्यामध्ये माघ महिन्याची सुरुवात होत आहे. हा माघ महिन्यात गणेश जयंती येत आहे म्हणजेच माघी गणपती देखील आहे. या आठवड्यात होणाऱ्या ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर पडणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी जानेवारीचा तिसरा आठवडा कसा राहील, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहणार आहे. या आठवड्यात घरात आणि बाहेर खूप विचारपूर्वक काम करावे लागेल. कामाच्या ठिकाणी असलेले अडथळे दूर होतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. गुंतवणूक केली असल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. या आठवड्यात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी वाद घालणे टाळावे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा फारसा चांगला राहणार नाही. मुलांशी संबंधित तुम्हाला चिंता जाणवतील. या आठवड्यात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. करिअर आणि व्यवसायात अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम आणि प्रयत्न यशस्वी होतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांना फायदा होईल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. जवळचे मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान आणि पद वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा फायदेशीर राहील. एखाद्या प्रकल्पात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लक्षणीय नफा मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो. नोकरी करणाऱ्यांना अचानक अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांशी तुमची जवळीक वाढेल. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात कोणतेही काम घाईघाईने करणे टाळावे, कारण चालू असलेले कामही बिघडू शकते. जीवनातील कोणत्याही आव्हानाला संयमाने सामोरे जा. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशीही चांगले संबंध ठेवणे योग्य राहील. कामाच्या ठिकाणी लोकांशी वाद घालणे किंवा कोणाचीही टीका करणे टाळा.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा फायदेशीर आहे. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. प्रवास करणे फायदेशीर राहील. तुम्ही या आठवड्यात धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धावपळीचा असू शकतो. कामासाठी तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायामध्ये प्रगती कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा हा आठवडा अनुकूल राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहील. तुमच्या शहाणपणाने आणि जवळच्या मित्रांच्या पाठिंब्याने, तुम्ही अखेर तुमच्या सर्व समस्यांवर उपाय शोधू शकाल. या आठवड्यात खर्चामध्ये वाढ होऊ शकते. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कनिष्ठ आणि वरिष्ठांशी समन्वय राखणे शहाणपणाचे ठरेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ ठरेल. या आठवड्यात करिअर किंवा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण होईल. चैनीच्या वस्तूंवर मोठी रक्कम खर्च करू शकता. या काळात तुम्हाला जमीन, इमारती आणि वाहनांचे फायदे मिळतील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून कमी सहकार्य आणि पाठिंबा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. करिअर आणि व्यवसायात अनुकूल संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. तुमच्या मुलांशी संबंधित कोणत्याही मोठ्या चिंता दूर झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






