भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये देशी दारू, वाईन, बिअर इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याचे सेवन केले जाते. त्यात रशियाची ओळख असलेले ड्रिंक म्हणजे रशियन व्होडका. हे केवळ ड्रिंक नसून तिथल्या नसानसात चालणाऱ्या संस्कृती आणि इतिहासाचा अविभाज्य घटक आहे. रशियातील प्रत्येक कार्यक्रमात व्होडका ड्रिंकला विशेष महत्व आहे. ‘व्होडका’ हा शब्द रशियन शब्द ‘व्होडा’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘पाणी’. आज आम्ही तुम्हाला रशियन व्होडका जगभरात कसा प्रसिद्ध झाला? भारतात रशियन व्होडक्याची किंमत काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
'या' रशियन दारूने संपूर्ण जगाला घातली भुरळ! भारतातील दारूची किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या

इतिहासात रशिया, पोलंड आणि स्वीडन यांच्यात व्होडकाच्या जन्मावरून वाद सुरू झाले होते. १४३० साली पहिल्यांदा मॉस्कोमधील एका मठात व्होडका तयार करण्यात आला होता. पूर्वीच्या काळी व्होडक्याचा वापर वेगवेगळ्या रोगांवरील उपचारासाठी केला जात होता. त्यानंतर हळूहळू रशियाच्या व्होडका ड्रिंक अर्थव्यवस्थेचा आणि राजकारणाचा भाग बनला.

व्होडका तयार करताना स्टार्च आणि साखर समृद्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. तीन ते चार दिवसांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अल्कोहोल तयार होते. या प्रक्रियेला डिस्टिलेशन असे म्हणतात.

व्होडक्याची तीव्रता संतुलित करण्यासाठी त्यात एक विशिष्ट प्रकारचे पाणी मिक्स केले जाते. बाजारातील मोठ्या ब्रॅण्डच्या यादीमध्ये कायमच व्होडक्याचे नाव घेतले जाते. स्टोलिचनाया हा व्होडक्याचा आयकॉनिक ब्रँड आहे. ज्याची 750 एमएलची किंमत सुमारे 1,500 रुपये इतकी आहे.

सायबेरियाच्या मैदानी प्रदेशात बनवलेल्या जाणाऱ्या व्होडक्याला भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मोठी मागणी आहे. या व्होडक्याची किंमत 5,990 रुपये आहे.

रशियन स्टँडर्ड हा भारतातील सगळ्यात लोकप्रिय ब्रँड आहे. याची भारतातील किंमत सुमारे 2,200 रुपये, ‘गोल्ड’ची किंमत 2,600 रुपये आणि ‘प्लॅटिनम’ ची किंमत सुमारे 5,000 रुपये इतकी आहे.






