दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही केवळ तिच्या सौंदर्यामुळेच नाहीतर फिटनेसमुळे सुद्धा कायमच चर्चेत असते. काही दिवसांआधी तिने चाहत्यांना एक गूड न्यूज देत बेबी बंपचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सामंथा तिच्या फिटनेसबाबतीत खूप जास्त जागरूक आहे. ती सुंदर आणि कायमच हेल्दी राहण्यासाठी स्वतःला त्रास होईल असा कोणताही डाएट किंवा वर्कआऊट करत नाही, ज्याचा परिणाम तिच्या शरीरावर दिसून येईल. घरातील साधे अन्नपदार्थ, भरपूर पाणी आणि व्यायाम हेच तिच्या फिटनेसचे खरे रहस्य आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – pinterest)
सामंथा रुथ प्रभू रोजच्या आहारात नियमित करते 'या' पदार्थांचा समावेश, जाणून घ्या फिटनेस सोबतच सौंदर्याचे रहस्य

सुंदर दिसण्यासाठी केवळ महागड्या प्रॉडक्टचा वापर नाहीतर नियमित वर्कआऊट, योगासने आणि घरातील साधे, सात्विक अन्नपदार्थांचे सेवन करून नॅचरल ग्लो मिळवू शकता.

सामंथाच्या परफेक्ट बॉडी शेपचे सगळ्यात मोठे रहस्य म्हणजे कायमची ती वर्कआऊट करते.आठवड्यातून ४ ते ५ दिवस वेट ट्रेनिंग, डेडलिफ्ट, स्कॉट्स, हिप थ्रस्ट, बेंच प्रेस, डंबल कर्ल आणि ट्रायसेप्स एक्सटेंशन यांसारखे वर्कआऊट करते.

न चुकता व्यायाम केल्यास शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहते आणि शरीर सतत आजारी पडत नाही. योगासने केल्यामुळे मानसिक शांतता मिळते, ज्याच्या परिणाम शरीरावर दिसून येतो.

सामंथा तिच्या डाएटमध्ये कायमच घरचे आणि साधे जेवण खाते. फायबर आणि प्रोटीन युक्त पदार्थांचे सेवन करण्यास ती जास्त प्राधान्य देते. आहारात डाळ- भात, चपाती, इडली आणि सुका मेवा, हिरव्या पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन करते.

घरचे साधे अन्न आणि दिवसभरात जितक्या कॅलरीज घेता येतील यावर तिचा कल जास्त असतो. शरीराला उगाचच उपाशी ठेवून कोणताही डाएट सामंथा फॉलो करत नाही.






