Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित
खरं तर, हल्ली लोकं मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करण्याला जास्त प्राधान्य देतात. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह ऑनलाईन शॉपिंग केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल, असं अनेकांना वाटतं. यामुळे कपड्यांपासून अगदी घरातील भाजीपर्यंत सर्वकाही आता ऑनलाईन ऑर्डर केलं जातं. पण यूजर्सची हीच सवय त्यांच्या फसवणूकीसाठी कारणीभूत ठरू शकते. हा फ्रॉड कसा होतो आणि यामध्ये लोकांची फसवणूक कशी केली जाते, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
सोशल मीडिया लोकांची फसवणूक करण्याचे एक माध्यम बनले आहे. अनेकदा सोशल मीडियावर स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी खोट्या जाहिराती आणि ऑफर्स शेअर करत असतात. अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लोकांना प्रोडक्ट स्वस्तात मिळण्याचा दावा केला जातो आणि याच ऑफर्स पाहून लोकं भुलतात आणि त्वरित वस्तू ऑर्डर करतात. वस्तू ऑर्डर तर केल्या जातात, पेमेंट देखील होतं पण त्या वस्तू डिलीव्हरचं होत नाही.
स्कॅमर्स सोशल मीडियावर लोकांना आकर्षित करण्यासाठी खोट्या जाहिराती आणि ऑफर्स शेअर करतात. या ऑफर्स पाहून अनेकजण स्वस्तात वस्तू खरेदी करण्याच्या मोहात ऑर्डर देतात आणि ऑनलाईन पेमेंट देखील करतात. यानंतर यूजर्सना व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवला जातो की, त्यांचे पार्सल पाठवण्यासाठी आधी ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी 1,299 रुपये जमा करावे लागतील. ऑर्डर डिलीव्हर झाल्यानंतर हे पैसे यूजर्सना परत दिले जातील, असा दावा देखील मेसेजमध्ये केला जातो. अनेकदा लोकं यावर विश्वास ठेवतात आणि पेमेंट करतात. अनेकदा विविध चार्जेसच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये उकळले जातात. इथेच सुरु होतो खरा स्कॅम…
Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम
पार्सल डिलीव्हर करण्याच्या नावाखाली अनेकदा लोकांकडून चार्जेस आकारले जातात. दावा केला जातो की, तुमचे पार्सल लवकरच पत्त्यावर पोहोचणार आहे. मात्र हे पार्सल कधी आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. इंस्टाग्राम रिल्स आणि पोस्ट्समधून हा स्कॅम मोठ्या प्रमाणात घडतो. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना नेहमी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.






