प्रत्येक त्वचेचा रंग वेगळा असतो. सावळा, गव्हाळ रंग असलेल्या महिलांना साड्यांच्या रंगाची निवड करताना अनेक अडचणी येतात. साडीचा रंग संपूर्ण लुक ठरतो. त्यामुळे आपल्या रंगला मॅच होईल अशी साडी निवडताना महिला खूप जास्त गोंधळून जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सावळ्या रंगावर कोणत्या साड्या उठावदार आणि आकर्षक दिसतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या रंगाच्या साड्या सर्वच महिलांच्या कपाटात असायलाच हव्यात. जाणून घ्या सविस्तर. (फोटो सौजन्य – pinterest)
सावळा रंगावर शोभून दिसतील 'या' आकर्षक रंगाच्या साड्या

सावल्या रंगाची त्वचा असलेल्या महिलांवर रॉयल ब्लु रंग अतिशय उठावदार आणि सुंदर दिसतो. या नैसर्गिक रंगाची साडी नेसल्यास त्वचेवर ग्लो येईल.

हळद किंवा लग्नातील इतर शुभ प्रसंगी तुम्ही मस्टर्ड यलो रंगाची साडी नेसून सुंदर लुक करू शकता. या रंगावर मोत्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतील.

रिच, फेस्टिव्ह आणि क्लासी टच देण्यासाठी डीप मरुन रंगांची साडी नक्की खरेदी करा. डीप मरुन रंगाची साडी कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही नेसू शकता.

सावळ्या रंगावर ऑलिव्ह ग्रीन अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. बाजारात ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या अनेक वेगवेगळ्या शेड्स उपलब्ध आहेत.

वेडिंग रिसेप्शन किंवा रात्रीच्या वेळी कोणत्याही कार्यक्रमाला जाताना तुम्ही वाइन पर्पल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता.






