अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. ३ तारखेला दोघांचाही लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
नुकतेच दोघांच्याही रिसेप्शन पार्टीचे फोटो समोर आले आहेत. शिवानी लाईट रंगाच्या लेहंग्यात अगदी खुलून दिसत होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी विराजसची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णीही होत्या.
विराजस आणि शिवानीचा लुक अगदी साजेसा होता. दोघांवरही सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.