लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चहा बिस्कीट खायला खूप आवडते. सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या नाश्त्यात सुद्धा अनेक लोक चहासोबत बिस्कीट खातात. छोटी मोठी भूक भागवण्यासाठी बिस्कीट खाल्ली जातात. मात्र नेहमी नेहमी बिस्कीट खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये सतत चहा बिस्कीट खाणे हानिकारक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सतत चहा बिस्कीट खाल्ल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
चहा बिस्कीट खाल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
उपाशी पोटी चहा बिस्कीट खाल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे अपचन होणे, ऍसिडिटी इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उपाशी पोटी बिस्किटांचे सेवन करू नये.
बिस्कीट तयार करण्यासाठी साखरेचे वापर केला जातो. यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे चहासोबत बिस्कीट खाऊ नये. मधुमेह असलेल्या रुग्णांनी चहासोबत बिस्कीट खाणे टाळावे.
बिस्कीटमध्ये वापरले जाणारे पीठ आणि अतिरिक्त साखरेमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्यामुळे दातांचे आरोग्य बिघडते. दातांमध्ये कीड लागणे, हिरड्या सुजणे, दातांमध्ये पोकळी निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.
बिस्कीट तयार करण्यासाठी मैद्याचा आणि इतर पिठाचा वापर केला जातो. हे पीठ आतड्यांसाठी चांगले नाही. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त होऊ शकते.