Side Effects of Zinc Rich Foods: आपल्या शरीरासाठी झिंक हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. मात्र झिंक पदार्थांचे अतिसेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अक्रोड, पिस्ता, बदाम, मसूर, डाळी, फॅटी फिश, भोपळ्याच्या बिया आणि अंडी यासारख्या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात झिंक असते. याबाबत डाएटिशियन निखिल वत्स यांनी साधारण प्रौढ व्यक्तींना दिवसातून किती झिंक हवे असते याबाबत सांगितले. 7.6 ते 9.7 मिलीग्रॅम इतक्या झिंकची शरीराला आवश्यकता भासते. मात्र यावर प्रमाण गेल्यास, अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, जाणून घ्या (फोटो सौजन्य - istock)
झिंक पदार्थांची शरीराला गरज असते हे खरं असलं तरीही या पदार्थांचे अतिसेवन मात्र त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे काय दुष्परिणाम होतात वाचा
जे लोक जास्त प्रमाणात झिंक पदार्थ खातात त्यांच्या जेवणात धातूस्वरूप चव असू शकते. त्यामुळे अन्नपदार्थांची चव नाही जाणवणार, यासाठी मर्यादित प्रमाणात सेवन करावे
झिंक मर्यादेपेक्षा जास्त सेवन केल्याने पोट आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी, अपचन असे त्रास होतात, त्यामुळे प्रमाण समजून घ्यावे
जीवनसत्त्वं आणि खनिजे दोन्हीची आपल्या शरीराला गरज असून झिंकयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास दोन्ही पोषक तत्वांचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते
जास्त प्रमाणात झिंक सप्लिमेंट्स घेतल्याने तुमची औषधे आणि इतर खनिजांचा ताळमेळ न राहता शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या
जर तुम्ही जास्त प्रमाणात झिंकयुक्त पदार्थ खाल्ले तर इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. थायरॉईडचे आजार, डोळ्यांच्या समस्या आणि श्वास घेण्यात अडचण अशा समस्यांचा यामध्ये समावेश आहे