प्रसिद्ध गायक दर्शन रावलने त्यांची दीर्घकालीन मैत्रीण अर्थात ‘बेस्ट फ्रेंड’ धरल सुरेलियासोबत लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याचे फोटो व्हायरल होत आहेत. दर्शनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर तिच्यासह फोटो अपलोड केल्यानंतर काही वेळातच फोटो व्हायरल झाले आहेत. अचानक लग्नाचे फोटो पोस्ट करत दर्शनने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. ‘सोनी सोनी’ फेम दर्शनचे अनेक चाहते आहेत आणि आपल्या सुरेल आवाजाने त्याने नेहमीच सर्वांचे मन जिंकलं आहे. पाहा दर्शन आणि पत्नी धरलचे मनमोहक फोटो (फोटो सौजन्य - Instagram)
'सोनी सोनी' फेम गायक दर्शन रावल यांचे १८ जानेवारी रोजी लग्न झाले. अनेक वर्ष डेट केल्यानंतर गर्लफ्रेंड धरल सुरेलियासह त्याने लग्नगाठ बांधली आहे
दर्शन रावल आणि धरल सुरेलिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यांच्या खास दिवसाची झलक दाखवली आहे ज्यात ते खूपच आनंदी आणि सुंदर दिसत आहेत
दर्शन रावलने कोलॅब करून धरलसह ही पोस्ट शेअर केली आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे ‘माझी बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर’
आपल्या लग्नात दर्शनने हस्तिदंती शेरवानी घातली होती ज्यामध्ये तो खूप देखणा दिसत होता. दरम्यान, वधू नारंगी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. पहिल्यांदाच चाहत्यांना दर्शनच्या जीवनसाथीची झलक मिळाली आहे
धरल सुरेलिया ही एक आर्किटेक्ट आणि इंटीरियर डिझायनर आहे, जिचा स्वतःचा डिझाईन स्टुडिओ आहे. वृत्तानुसार दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि अखेर लग्नबंधनात अडकले आहेत
दर्शन आणि धरल दोघांनीही लग्नात सुंदर कॉम्बिनेशन केल्याचे दिसून येत असून दोघांवरूनही नजर हटत नाहीये. तर अचानक लग्नाचे फोटो समोर आल्याने नक्कीच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे आणि कमी वेळातच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय