स्पृहा जोशी ही एक उत्कृष्ट मराठी अभिनेत्री आहे. स्पृहाने अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणीमध्ये काम केले आहे. ती प्रामुख्याने मराठी मालिका उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट अशा मालिकेमध्ये काम करताना दिसली आहे. तसेच ती सूर नवा ध्यास नवा आणि किचन सुपरस्टार अशा मराठी टेलिव्हिजन कार्यक्रमात ती झळकली आणि स्वतःच्या हिंमतीवर पुढे आलेली ही अभिनेत्रु आहे. तसेच स्पृहा सध्या कलर्स मराठीवरील ‘सुख कळले’ या मालिकेत मुख्यभूमिका करताना दिसत आहे. याचदरम्यान ती ‘शक्तिमान’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच आज जागतिक समुद्र दिवस असल्यामुळे पाहुयात तिचे काही फोटोज.
समुद्रावर तर सगळेच प्रेम करताना दिसतात मात्र ते कधीच व्यक्त होताना दिसत नाहीत. आज जागतिक समुद्रदित असल्यामुळे अनेक अभिनेत्रींनी त्यांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अशीच एक पोस्ट स्पृहानेदेखील केली आहे.
स्पृहाने समुद्रसोबतचे तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्पुहाने हे फोटोज शेअर करून तिचे समुद्रावर किती प्रेम आहे हे दाखवून दिले आहे.
या शेअर केलेल्या सगळ्या फोटोजमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. काही फोटोज तिचे जुने असून, तर काही नुकतेच काढलेले फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तसेच या समुद्रासोबत स्पृहाने सनग्लासेस लावून फोटोज काढले आहेत. या सगळ्या फोटोत तिला झालेला आनंद आणि प्रत्येक समुद्राप्रेमीला समुद्र पाहून येणाऱ्या निर्मल भावना या व्यक्त होताना दिसत आहे.
स्पुहाने अनेक चित्रपट गाजवून ती अजून नव्यानव्या प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या समोर येईल यात शंकाच नाही.