सर्वच महिलांचा आवडता सण म्हणजे मकरसंक्रांत. हा असा सण ज्यादिवशी महिला काळ्या रंगाची साडी परिधान करतात. इतर कोणत्याही दिवशी काळ्या रंगाची साडी फारशी नेसली जात नाही. मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगला खूप जास्त महत्व आहे. पण बऱ्याचदा काळ्या रंगच्या साडीवर नेमका कसा लुक करावा, हे बऱ्याचदा समजत नाही. अशावेळी तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रींनी काळ्या साडीवर केलेले सुंदर आणि आकर्षक लुक करू शकता. या लुकमुळे तुमचे चारचौघांमध्ये खूप जास्त कौतुक होईल आणि तुम्ही स्टायलिश, आकर्षक दिसाल. (फोटो सौजन्य – pinterest)
यंदाच्या मकरसंक्रांतीला बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे काळ्या साडीवर करा स्टायलिश मॉर्डन लुक

अभिनेत्री आलिया भट्टने काळ्या साडीवर केलेला मॉर्डन लुक तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करू शकता. वेल्वेटच्या काळ्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या शुभ्र मोत्यांची माळ अतिशय उठावदार दिसेल.

हल्ली बनारसी आणि कांजीवरम सिल्क साड्यांचा मोठा ट्रेंड आला आहे. काळ्या रंगची बनारसी साडी परिधान करून तुम्ही त्यावर सोन्याची फिनिशिंग असलेले सुंदर सुंदर दागिने घालू शकता.

संक्रांतीच्या काळ्या साडीवर जर तुम्हाला इतरांपेक्षा हटके लुक हवा असेल तर या पद्धतीने साडी आणि दागिने स्टाईल करू शकता. चारचौघांमध्ये गेल्यानंतर सुंदर उठावदार दिसाल.

काळ्या रंगाच्या पैठणी किंवा टिपिकल साडीवर अंबाडा, सुंदर सुंदर मोत्याचे दागिने आणि मोठी टिकली असा पारंपरिक लूक सुंदर वाटेल. असा लुक तुम्ही लग्नसमारंभात सुद्धा करू शकता.

खणाच्या पैठणी साडीला खूप जास्त मागणी आहे. त्यामुळे घरातील हळदीकुंकू सोहळ्यात तुम्हाला जर पारंपरिक लुक हवा असेल तर खणाच्या पैठणी साडीची निवड करावी.






