महिला सुंदर दिसण्यासाठी कायमच वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने घालतात. त्यातील अतिशय आवडीने घातला जाणारा दागिने म्हणजे नोजरिंग. हल्ली नवनवीन दागिन्यांचा ट्रेंड आला आहे. त्यात नथ, नोज रिंग आणि सोन्याच्या नोज पिन्स इत्यादी डिझाईन्सची मोठी क्रेझ वाढली आहे. काहींना नियमित नाकामध्ये नोज रिंग घालण्याची सवय असते. यामुळे लुक स्टायलिश आणि उठावदार दिसतो. ऑफिस, कॉलेज, पार्टी किंवा लग्नसमारंभ घातला जाणारा नाजूक साजूक दागिना पूर्ण लुक बदलून टाकतो. जाणून घ्या नोजरिंगच्या या काही सुंदर डिझाईन. (फोटो सौजन्य – pinterest)
नाकात शोभून दिसेल 'या' सुंदर डिझाईनची नोजपिन्स, रोज वापरण्यासाठी पाहा आकर्षक डिझाईन

कोणत्याही साडी किंवा ड्रेसवर सर्कल नोज पिन उठावदार दिसतो. रोज घालण्यासाठी तुम्ही सर्कल नोज पिनचा वापर करू शकता.

सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे डायमंड दागिने सुद्धा परिधान केले जातात. या डिझाईनची नोजपिन घातल्यानंतर लुक सुंदर दिसेल. डायमंड नोजपिन मुली आवडीने घालतात.

साऊथ इंडियन लग्न सोहळ्यांमध्ये महिला प्रामुख्याने या डिझाईनचे नोज पिन परिधान करतात. यामुळे लुक पारंपरिक आणि वेगळा दिसतो. या डिझाईनचे नोजपिन बाजारात सहज उपलब्ध होतात.

काहींना या डिझाईनची नोजपिन घालायला खूप जास्त आवडते. इतरांपेक्षा हटके आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही राऊंड शेप असलेली नोजरिंग ट्राय करू शकता.

रोजच्या वापरात घालण्यासाठी नाजूक साजूक डायमंड नोजपिन उत्तम पर्याय आहे. सिंगल डायमंड कोणत्याही साडी ड्रेसवर सूट होतो.






