मार्च एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात वाढ होते. वाढत जाणाऱ्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याशिवाय फळांचा ज्यूस देखील महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा शरीराला थंडावा मिळावा म्हणून कोल्ड्रिंकचं सेवन केलं जातं. कोल्ड्रिंक ऐवजी फ्रेश फळांची स्मुदी सेवन करणं आरोग्यदायी आहे.
मिक्स फ्रूट ओट्स स्मूदी: उन्हाळ्यात जी फळं बाजारात मिळतात ती फळं दूध आणि ओट्स एकत्र करून स्मुदी प्या.
मँगो बनाना स्मूदी: आंबा, केळी, बदाम आणि दूध एकत्र करून मँगो बनाना स्मूदीचं सेवन करु शकता.
वॉटरमेलन स्मूदी: सतत कलिंगड खाऊन कंटाळा आला असेल तर कलिंगड, दूध किंवा नारळाचं पाणी एकत्र करून त्याची स्मूदी तयार करू शकता.
चॉकलेट बनाना स्मूदी: अनेकांना केळी खाणं आवडत नाही मात्र चॉकलेच आणि केळी याची स्मूदी करुन प्यायल्यास शरीराला मोठ्या प्रमाणात पोषक घटक मिळतात.
बेरीज स्मूदी: उन्हाळ्यात त्वचा मोठ्य़ा प्रमाणात काळवंडते. जर तुम्ही रोज सकाळी स्ट्रॉबेरी, ब्लेकबेरी आणि ब्लूबेरी दूधात मिक्स त्याची स्मुदी प्यायल्यासं त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
मिंट स्मूदी: गरमीच्या दिवसात पुदिन्याचं सेवन आरोग्यदायी मानलं जातं. पुदिना शरीरात थंडावा निर्माण करतो. पित्ताच्या त्रासावर पुदिना गुणकारी आहे. उन्हाळ्यात मिळणारी फळं, दूध आणि पुदीन्याची पानं एकत्र करून मिंट स्मूदी तयार करा. पाहुणे आल्यास कोल्ड्रिंक ऐवजी तुम्ही याता हे स्मूदी देऊ शकता.