झोपेत आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात. काही स्वप्नांचा अर्थ लागतो पण काहींचा अर्थ लागता लागत नाही. स्वप्नात आपल्याला कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. बऱ्याचदा स्वप्नांतून जागे होताना आपण अचानक घाबरुन, डचकून उठतो. अशा स्वप्नांमागचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत. स्वप्न शास्त्रानुसार, आपली स्वप्ने आपल्या मानसिक आणि शारिरिक आरोग्याशी खोलवर जोडलेली असतात.
स्वप्न पाहताना अचानक भिती का वाटते? जाणून घ्या यामागचं कारण

स्वप्नशास्त्रामध्ये आपल्या स्वप्नांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. झोपण्यापूर्वी योग्य वेळी खाणे, ध्यान करणे आणि सकारात्मक विचार यामुळे वाईट स्वप्ने येण्यापासून मुक्तता मिळवण्यास मदत होते

ताण, चिंता, झोपेची कमतरता, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि मानसिक दबावामुळे भितीदायक स्वप्ने येऊ लागतात.

याशिवाय काही औषधे, अल्कहोलचे सेवन, कॅफिन आणि झोपेचा अभाव यामुळे भयानक स्वप्ने येऊ शकतात

झोपण्यापूर्वी चीज किंवा कोणत्याही दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने वाईट स्वप्ने येऊ शकतात असे एका अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे पोटात गॅसचीही समस्या निर्माण होऊ शकते

दिवसभरातील मानसिक थकवा आणि जास्त विचार केल्याने मेंदूला भयानक स्वप्न पडतात. ताणतणाव आणि चिंता भयानक स्वप्ने येण्याचे मुख्य कारण ठरु शकते






