TasteAtlas ने त्यांच्या 2024/25 च्या जागतिक खाद्य पुरस्कारांमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीला 12वा क्रमांक दिला आहे. या यादीत चार भारतीय पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय, भारतातील सहा शहरांना "100 सर्वोत्तम खाद्य प्रदेशां" मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यात मुंबई 5व्या आणि अमृतसर 43व्या क्रमांकावर आहेत. हे भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचे प्रतीक आहे.
TasteAtlas च्या यादीत या भारतीय खाद्य पदार्थांनी मारली बाजी. ( फोटो सौजन्य - Social Media )
मुळात, या चार भारतीय खाद्य पदार्थांमधील दोन खाद्य पदार्थांचा समावेश आहे टॉप ५० मध्ये आहे. भारताची चव जगाच्या पाठीवर पोहचवणारे हे खाद्य पदार्थ आहेत तरी कोणते? चला तर मग जाणून घेऊयात.
भाजलेले मांस, मसाले, क्रीम, टोमॅटो आणि लोण्याने बनवलेले बटर चिकन जगातील 100 सर्वोत्तम खाद्यपदार्थांच्या यादीत 29व्या क्रमांकावर आहे.
बासमती तांदूळ, मटण किंवा चिकन, लिंबू, दही, कांदा आणि केशराने बनवलेली हैदराबादी बिर्याणी या यादीत 31व्या स्थानावर आहे.
कोलंबियातील लेचोना ही डिश जगातील सर्वाधिक पसंतीची मानली जाते. ही डिश कांदे, वाटाणे, तांदूळ आणि मसाल्यांनी भरलेले भाजलेले पोर्क आहे. दुसऱ्या क्रमांकावर इटलीचा पिझ्झा नेपोलेटाना आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा पिकान्हा आहे.
या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक ४१ वा आहे. येथील मिसळ पाव, आमरस, श्रीखंड आणि पाव भाजी जगभरातील खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवतात.