भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये ६ ऑक्टोबरपासून T२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये भारत बांग्लादेश यांच्यामध्ये तीन सामने होणार आहेत. भारताचा संघ कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वखाली खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दमदार अष्टपैलू हार्दिक पांड्या मोठ्या विश्रांतीनंतर संघामध्ये पुनरागमन करणार आहे. त्याचबरोबर संघामध्ये अनेक नव्या खेळाडूंचा देखील सहभाग आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारताचा संघ सध्या मैदानात घाम गाळत आहे. सराव करतानाचे काही खास फोटोंवर भारतीय खेळाडूंच्या ऍक्शनवर नजर टाका.
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा संघ बांग्लादेश विरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेत सूर्याच्या कॅप्टन्सीमध्ये एकतर्फी विजय मिळवला होता.
भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा नेहमीच त्याच्या विस्फोटक फलंदाजी साठी ओळखला जातो, त्यामुळे भारत बांग्लादेश यांच्यामध्ये होणाऱ्या त्याच्या फलंदाजीवर प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत.
भारताचा T२० विश्वचषकातील स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह पुन्हा ऍक्शनमध्ये दिसणार आहे. त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
भारताचा मॅच फिनिशर रिंकू सिंहला सुद्धा संघामध्ये स्थान देण्यात आले आहे, त्यामुळे त्याची भूमिका संघामध्ये काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे.
संजू सॅमसनला सुद्धा संघामध्ये स्थान मिळाले आहे, त्यामुळे विकेटकिपरची भूमिका संजय सॅमसनकडे असणार आहे. त्याचबरोबर त्याच्या फलंदाजीकडे सुद्धा क्रिकेट प्रेमींच्या नजरा असणार आहेत.