२०२५ मध्ये एकता कपूरची दिवाळी पार्टी टीव्ही कलाकारांनी भरलेली दिसत होती. या भव्य समारंभात टीव्ही आणि बॉलिवूडमधील अनेक प्रमुख चेहरे या पार्टीमध्ये सहभागी झालेले दिसले. दरवर्षीप्रमाणे, एकता कपूरच्या दिवाळी पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. टेलिव्हिजनची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरने तिच्या घरी एक भव्य दिवाळी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेक प्रमुख कलाकार उपस्थित होते.
एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत चमकले टीव्ही सेलिब्रेटी (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी स्टायलिश लूकमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधले. तेजस्वी प्रकाशने काळ्या रंगाची साडी परिधान केली होती, तर करण कुंद्राने मल्टीकलर वर्कसह हलक्या गुलाबी रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता घातला होता.
एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत अनिता हसनंदानी रेड्डी खूपच ग्लॅमरस आणि क्लासी दिसत होती. तिने ऑफ वाईट रंगाची साडी परिधान केली होती. तसेच अभिनेत्रीने ॲक्सेसरीजमध्ये डायमंडचा नेकलेस देखील घातला होता.
फोटोमध्ये, करण पटेल आणि अंकिता भार्गव एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत सामील होताना दिसत आहे. करण पटेलने काळ्या रंगाचा शीअर कुर्ता आणि खाली काळा पायजमा घातला आहे. अंकिता भार्गवने सुंदर बहुरंगी भरतकाम आणि आरशाचे काम असलेला काळा कुर्ता सेट घातला आहे.
दिवाळी पार्टीत धनश्रीने गुलाबी-लाल रंगाची साडी आणि सुंदर ब्लाउज परिधान केला होता. तिने स्पार्कलर घेऊन पोज देखील दिली. धनश्रीने पापाराझींसमोर दिवाळी साजरी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री हुमा कुरेशी या दिवाळी पार्टीत तिचा कथित बॉयफ्रेंड रचित सिंगसोबत सहभागी झाली होती. रचितने काळा कुर्ता घातला होता, तर हुमाने निळा सूट घातला होता. दोघांनी पॅप्ससाठी एकत्र पोज दिल्या.
'राईज अँड फॉल'चा विजेता अर्जुन बिजलानी त्याची पत्नी नेहा स्वामीसोबत पार्टीत पोहोचला. अर्जुनने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती, तर नेहाने जाड क्रीम रंगाचा लेहेंगा घातला होता. दोघेही खूपच सुंदर दिसत होते. एकत्र पोज देऊन या जोडप्याने पार्टीत चमक आणली.