नुकतेच netflix वर रिलीज झालेला चित्रपट 'The Great Flood' सोशल मीडियावर साऱ्यांचे लक्ष वेधत आहे. सुरुवातीला फक्त Disaster Movie वाटणारा हा सिनेमा चित्रपटाच्या मध्यान्हात मोठा वळण घेतो. सुरुवातीला Disaster वाटणारा सिनेमा अंतिम वेळेत एक Sci Fi चित्रपट बनतो. या चित्रपटाची कथा प्रत्येकाला चकित करणारी आहे.
The Disaster Movie नेटफ्लिक्सचा नवा कोरा चित्रपट. (फोटो सौजन्य - Social Media)

'The Great Flood' हा एक साऊथ कोरियन चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये लोकांचा आक्रोश आणि आई-लेकाची कथा दाखवली गेली आहे.

या कथेत सुरुवातीला चित्रपटाचे मुख्य पात्र (आई आणि तिचा ६ वर्षांचा लेक) दोघे त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात झोपले असतात. त्यावेळी मुलगा त्याच्या आईला सांगतो की बाहेर पाणी भरलंय आणि इथून चित्रपटाला सुरुवात होते.

समुद्रातील बर्फाचा मोठा पर्वत वितळल्याने समुद्राचे तळ वाढते आणि त्यातून निघालेल्या एकाएका लाटेत सगळं काही संपत जातं. मुख्य पात्र ज्या इमारतीत राहतात, त्या इमारतीचे एकेक मजलेही हळूहळू पाण्यात बुडत जातात.

या चित्रपटाची मज्जा तेव्हा सुरु होते जेव्हा माध्यान्ह येतो कारण मध्यान्हात चित्रपट पुन्हा सुरुवातीपासून सुरु होतो. पुन्हा त्याच त्याच गोष्टी घडू लागतात. एकदा नव्हे तर हजारदा!

चित्रपटाच्या शेवटी या सिनेमाला मोठे वळण येते कारण या चित्रपटात असे दाखवले आहे की शेवटी अख्ख्या जगात फक्त मुख्य पात्र ते दोघेच उरले असतात.






