हे जग फार मोठे आहे आणि या जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टी या आपल्यापासून कोसो दूर दडलेल्या आहेत ज्यांची आपल्याला काहीच माहिती नाही. असं म्हणतात की, कोणताही व्यक्ती या जगात आपल्या मर्जीने येत नाही किंवा जात नाही पण आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एक ठिकाणाविषयी माहिती देत आहोत, जिथे कोणत्याही व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू ही घटना ही फक्त कायदेशीररित्या होऊ शकतो. हे अनोखे नियम या ठिकाणाला इतर ठिकाणाहून वेगळे बनवतात मात्र तरीही इथे लोक राहतात. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जगातील एकमेव असे ठिकाण जिथे जन्म-मृत्यू दोन्ही आहे बेकायदेशीर, ना मरण्याची परवानगी ना जगण्याची...
स्वालबार्ड (Svalbard) हे ठिकाण त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, एकदा तुम्ही इथे पोहोचलात की तुम्हाला परत जावेसे वाटत नाही. हे बेट नॉर्वेचा भाग आहे आणि आर्क्टिक महासागरात स्थित आहे. विशेष म्हणजे येथे येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्हिसा लागत नाही.
तथापि, येथे राहण्यासाठी काही कडक कायदे पाळणे बंधनकारक आहे. या ठिकाणाबद्दल सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथे मुलांचा जन्म आणि लोकांचा मृत्यू बेकायदेशीर मानला जातो, ज्यामुळे ते जगातील सर्वात अद्वितीय ठिकाणांपैकी एक बनते
वास्तविक, स्वालबार्डमध्ये इतकी थंडी असते की जर एखाद्या व्यक्तीचा येथे मृत्यू झाला तर त्याचे शरीर कुजत नाही तर वर्षानुवर्षे शरीर अबाधित राहते. यामुळेच एखादा व्यक्तीचा संसर्गाने जर मृत्यू झाला तर त्याचे विषाणू वर्षानुवर्षे जिवंत राहू शकतात. यामुळे, तेथे राहणाऱ्या इतर लोकांमध्ये हा आजार पसरण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो
याच कारणामुळे प्रशासनाने येथे मृत्युवर बंदी घातली आहे. जर एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल किंवा मृत्यूच्या जवळ असेल तर त्याला हेलिकॉप्टरने नॉर्वेच्या मुख्य भूमीवर पाठवले जाते, जिथे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात
स्वालबार्डमध्ये मुलांना जन्म देण्यासाठीही परवानगी दिली जात नाही. जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिला प्रसूतीपूर्वी बेट सोडावे लागते. याचे कारण म्हणजे येथील एकमेव रुग्णालय खूपच लहान आहे आणि तेथे प्रसूतीशी संबंधित आवश्यक वैद्यकीय सुविधा नाहीत. म्हणूनच, आई आणि बाळाच्या सुरक्षिततेचा विचार करून, गर्भवती महिलांना बाळाला जन्म देण्यासाठी नॉर्वेतील दुसऱ्या शहरात जावे लागते.