मराठमोळा लुक पूर्ण करण्यासाठी साडी नेसल्यानंतर नाकात नथ घातली जाते. नथीशिवाय साडीवरील लुक अपूर्णच वाटतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझानच्या नथ उपलब्ध आहेत. लग्नात नऊवारी नेसल्यानंतर त्यावर मोठ्या आकारातील नथ घातली जाते. त्यातील मोराची नथ खूप जास्त ट्रेडींगला आहे. नथीमधील मोर अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मोराच्या आकारातीलकाही नथीचे काही सुंदर डिझाईनबद्दल सांगणार आहोत. या डिझाईनच्या नथ घातल्यानंतर लुक अतिशय देखणा आणि सुंदर दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
नऊवारी साडीवर उठावदार दिसतील 'या' डिझाईनच्या मोर नथ

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मोराची नथ घालायला खूप जास्त आवडते. मोर नथीना बाजारात खूप जास्त मागणी आहे. त्यामुळे सोन्याच्या तारांमधील नथ खरेदी करू शकता.

मोत्याच्या मण्यांमध्ये गुंफलेली मोराची नथ नऊवारी साडीवर अतिशय सुंदर दिसेल. नथीमध्ये असलेले डायमंड लुक आणखीनच स्टायलिश आणि मराठमोळा करतात.

काहींना खूप युनिक दागिने परिधान करायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझानची नथ घालून मिरवू शकता. आकाराने मोठी असलेली नथ पारंपरिक कपड्यांवर अतिशय सुंदर दिसते.

मोराचा सुबक आकार आणि आजुबाजुला जडविण्यात आलेले खडे नथीची शोभा वाढवतात. ही आगळी वेगळी डिझाईन घातल्यास सगळेच तुमच्याकडे पाहत बसतील.

सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे बाजारात सिल्वर आणि ऑक्सिडाईज नथ सुद्धा उपलब्ध आहे. आकाराने लहान असलेल्या नाजूक नथ अतिशय सुंदर दिसतात.






