सणावाराच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरात वेगवेगळ्या चिवड्याचे प्रकार बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी भूक लागल्यानंतर बिस्कीट किंवा इतर तेलकट पदार्थ आणून खाल्ले जातात. यासोबतचज चिवडा देखील खाल्ला जातो. दिवाळी सणाला सगळ्यांच्या घरात पोह्यांचा चिवडा आवडीने बनवला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिवड्याचे काही प्रकार सांगणार आहोत. जे तुम्ही घरीसुद्धा सहज बनवू शकता. तुम्ही बनवलेला चिवडा लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. (फोटो सौजन्य: Pinterest)
तोंडाची वाढेल चव! नाश्त्यात करा 'या' चिवड्यांचे सेवन
अतिशय लोकप्रिय चिवड्याचा प्रकार म्हणजे पातळ पोह्यांचा चविष्ट चिवडा. पोह्यांचा चिवडा प्रामुख्याने दिवाळी सणाला मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे आणि पोह्यांचा वापर करून बनवलेला चिवडा चवीला अतिशय सुंदर लागतो.
उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात बटाट्याचा किंवा साबुदाण्याचा चिवडा आणून खाल्ला जातो. हा चिवडा बाजारात सहज उपलब्ध होतो. तिखट गोड चवीचा चिवडा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो.
तांदळाच्या बारीक लाह्यांचा वापर करून बनवलेला झणझणीत तिखट चिवडा प्रत्येक घरात असतोच. हा चिवडा पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.
मुरमुऱ्यांचा वापर करून बनवलेला भडंग चिवडा चवीला अतिशय सुंदर लागतो. हा चिवडा चवीला अतिशय तिखट असतो. कोल्हापुरी मसाल्यांचा वापर करून बनवलेला चिवडा जेवणासोबत सुद्धा खाल्ला जातो.
काहींना सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ खाण्याची सवय असते. अशावेळी तुम्ही मखाणा चिवडा बनवून खाऊ शकता. मखाणा भाजून त्यात वेगवेगळे मसाले टाकून मखाणा चिवडा बनवला जातो.