जुन्या काळापासून सासू-सूनेची जोडी फार लोकप्रिय आहे आणि याचबरोबर प्रसिद्ध आहेत ते त्यांच्यात उडणारे खटके. सासू-सून असली की त्यांच्यात वाद हा होणारच हे जणू एक समीकरणच बनले आहे. कुटुंब कितीही हसत खेळत असलं तरी सासू-सूनांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून लहान सहन खटके आणि भांडणं ही होतच राहतात. अनेकदा यात गैरसमज कारणीभूत ठरत असतो, यामुळे कुटुंबाचे वातावरणही खराब होते अशात यामागील प्रमुख कारणे जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते.
या 5 कारणांमुळे सासू-सूनेच्या नात्यात उडतात खटके; कुटूंबातील वातावरणही होते दूषित
नव्या विचारसरणीच्या सुना जेव्हा पारंपारीक चालीरीती आणि परंपरा पाळायला नकार देतात तेव्हा सासू-सूनेत दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. बोलून एकमेकींना समजावून या गोष्टी एकत्रितपणे समजून घेता आल्या पाहिजेत
सासू-सूनेच्या भांडणातील एक प्रमुख कारण पती देखील ठरत असतो. मुलाने सासूसाठी कोणती गोष्ट केली तर बायकोला वाईट वाटते आणि बायकोसाठी काही केले तर सासूला वाईट वाटते. इथूनच नात्याची खेचाखेची सुरु होते
अनेकदा काही सूना घरातील कामाकडे फारसं लक्ष देत नाही आणि कामाची टाळाटाळ करु लागतात अशात सासवांना ही गोष्ट पटत नाही आणि इथूनच नात्यात संघर्ष निर्माण होऊ लागतो
काही सूनांना लग्नानंतरही आपल्या सासरच्या गोष्टींचा सासरी गाजावाजा करण्याची फार हाैस असते. त्या नेहमीच आमच्याकडे असं नाही करायचे, आमच्याकडे असं असायच अशा गोष्टी बोलू लागतात ज्या सासूला आवडत नाहीत. परिणामी सून आपल्या घराचा आदर करत नाहीत अशी भावना सासूच्या मनात निर्माण होते
बऱ्याचदा सूना सासू-सासऱ्यांना विचारल्याशिवाय घरातील महत्त्वाचे निर्णय घेऊ लागतात, जे सासूला आवडत नाही. आपल्या निर्णयांना घरात काहीच महत्त्व नाही असे सासूला वाटू लागते आणि मग ती सुनेवर डाफरु लागते