चहा हे भारतीय कुटुंबियांमध्ये आवडीने पिले जाणारे एक लोकप्रिय पेय आहे. अनेकांच्या सकाळची सुरुवात चहाने होत असते. तसेच बऱ्याचदा कामामुळे आलेला थकवा, ताण दूर करण्यासाठीही चहाचे सेवन केले जाते. चहा आपल्याला रिफ्रेशमेंट देत असला तरी त्यासोबत खाल्ले जाणारे काही पदार्थ मात्र आपल्या आरोग्यास घातक ठरत असतात. चला यात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश आहे, ते जाणून घेऊया.
भजी, टोस्ट, बिस्कीट... हे आहेत चहासोबतचे सर्वात वाईट कॉम्बिनेशन्स; देतात आजारांना खुलं आमंत्रण
अनेकदा चहासोबत गरमा गरम, कुरकुरीत भजी सर्व्ह केले जातात जे आरोग्यास चांगले ठरत नाहीत. चहा आणि भजींचे हे काॅम्बीनेशन यकृताला डिटाॅक्सिफाय करण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे त्वचेची चमक कमी होऊ शकते
यासोबतच बऱ्याचदा गरमा गरम चहासोबत कुरकुरीत टोस्ट देखील फार मजा घेत खाल्ला जातो. यात मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह्ज जास्त प्रमाणात असतात. चहामध्ये कॅफीन असते जे टोस्टसह मिसळताच रक्तदाब वाढू शकतो. हे काॅम्बिनेशन उच्च रक्तदाब रुग्णांसाठी धोकादायक ठरु शकते
याचबरोबर चहासोबतचे लोकप्रिय काॅम्बीनेशन बिस्कीट देखील पोटाभोवती चरबी जमा करण्याचे काम करते. बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट, रिफाइंड पीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते जे लठ्ठपणा आणि मेटाबाॅलिक सिंड्रोमचा धोका वाढवू शकते
ब्रेड आणि चहा यांच काॅम्बिनेशन शरारात आम्लाची पातळी वाढवण्याचे काम करते. यांचे एकत्रित सेवन केल्यास गॅस, छातीत जळजळ आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात
चिवडा, चिप्स असे खारट पदार्थ चहासोबत खाल्लयाने शरीरातील पाणा बाहेर पडते कारण त्यात सोडियमचे प्रमाण अधिक असते. हे दोन्ही एकत्रितपणे शरीरीला डिहायड्रेट करु शकतात आणि पोटफुगी, थकवा यासारख्या समस्या निर्माण करु शकते