चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात बदल केल्यानंतर शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. लिव्हरला सूज येणे, वजन अचानक कमी होणे, भूक न लागणे, सतत थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय लिव्हर खराब होण्याची शक्यता असते. जंक फूडचे सेवन, कोल्ड्रिंक, मद्यपान इत्यादी हानिकारक गोष्टींचे सेवन केल्यामुळे लिव्हरवर परिणाम होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरने त्रस्त असलेल्या लोकांनी कोणत्या पेयांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी 'हे' ड्रिंक ठरतील घातक
फ्लेवर्ड वॉटरमध्ये आर्टिफिशियल रंग आणि जास्त साखर आढळून येते, ज्यामुळे लिव्हरचे कार्य बिघडते. त्यामुळे लिव्हरसबंधित समस्या असलेल्या लोकांनी फ्लेवर्ड युक्त पाणी पिऊ नये.
बीयरमध्ये कमी अल्कोहोल असले तरीसुद्धा कॅलोरीजचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो. बियरचे जास्त सेवन केल्यामुळे लिव्हरचे कार्य बिघडते.
चहा कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. यामुळे लिव्हरसह शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. यामध्ये असलेल्या कॅफिनमुळे लिव्हरचे नुकसान होते.
लिव्हरसंबंधित समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ताज्या फळांचे सेवन करावे. पण फळांपासून बनवलेल्या रसाचे सेवन करू नये. यामध्ये असलेली साखर शरीरात लगेच विरघळते, ज्यामुळे लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होते.
फॅटी लिव्हरने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड्रिंक्सचे सेवन करणे टाळावे. कारण यामध्ये रिफाइंड शुगर किंवा फ्रुक्टोज इत्यादी हानिकारक घटक असतात, जे लिव्हरवर नकारात्मक परिणाम करतात.