इंडीयन प्रिमियर लिग 2025 चा आज 56 वा सामना खेळवला जाणार आहे, हा सामना मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. पण त्याआधी कोलकता नाइट राइडर्सविरूध्द झालेल्या सामन्यात रियान परागने कमालीची खेळी खेळली होती. यामध्ये त्याने 6 षटकार मारले आणि आयपीएलमध्ये नवा रेकॅार्ड केला होता. आयपीएलमध्ये 5 षटकार एकाच ओव्हरमध्ये ठोकणारे फलंदाजांच्या यादीमध्ये आता रियान परागचे नाव देखील सामील झाले आहे.
आयपीएलच्या इतिहासात एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स ठोकणारे फलंदाज. फोटो सौजन्य - IndianPremierLeague
2012 मध्ये रॅायल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार ख्रिस गेल याने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार मारण्याचा रेकॅार्ड नावावर केला होता. हो रेकॅार्ड त्याने राहुल शर्मा याच्या विरूध्द केला होता. फोटो सौजन्य - IndianPremierLeague
2020 मध्ये राहुल तेवतिया याने संघासाठी कमालीची कामगिरी केली होती, त्याने जमाइकाचा शेल्डन कॉट्रेलच्या विरूध्द त्याने एकाच ओव्हरमध्ये पाच षटकार ठोकले होते. फोटो सौजन्य - IndianPremierLeague
भारताचा स्टार अष्टपैलु रविंद्र जडेजा याने देखील हा विक्रम नावावर केला आहे. 2021 मध्ये हर्षल पटेलच्या विरोधात रविंद्र जडेजाने पहिल्या 3 बॅालमध्ये 3 षटकार मारले होते तर तिसरा बॅाल नो बॅाल झाला त्यामुळे आणखी एक बॅाल एक्ट्रा मिळाला. त्यानंतर त्याने 6, 2, 6, 4 असे मारले आणि एकाच ओव्हरमध्ये 37 धावा केल्या. फोटो सौजन्य - IndianPremierLeague
रिंकु सिंगची धुव्वादार खेळी प्रतेकाच्याच लक्ष्यात आहे. त्याने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार मारले आणि स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्याने हा पराक्रम 2023 मध्ये यश दयालच्या विरोधात केला होता आणि सामना केकेआरने जिंकला होता. फोटो सौजन्य -IndianPremierLeague
आयपीएल 2025 मध्ये हा विक्रम रियान परागने कोलकता विरूध्द मोइन अलीच्या विरोधात केला पण हा सामना राजस्थानच्या संघाला 1 धावेने गमवावा लागला होता. फोटो सौजन्य - IndianPremierLeague