जगभरात सगळीकडे २१ जूनला जागतिक मार्टिनी दिन साजरा केला जातो. मार्टिनी हा एक कॉकटेलचा प्रकार आहे. जगभरात सगळ्यांचं मार्टिनी पेय प्यायला खूप जास्त आवडते. पार्टी किंवा इतर सण समारंभात मार्टिनी हे पेय आवर्जून ठेवले जाते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक लोक एकाच प्रकारची मार्टिनी पितात. मात्र यामध्ये अनेक वेगवेगळे फ्लेवर्ससुद्धा उपलब्ध आहेत. मार्टिनीपेय अनेक वेगवेगळ्या चवीमध्ये उपलब्ध आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मार्टिनीचे काही सुंदर आणि प्रसिद्ध फ्लेवर्स सांगणार आहोत. हे फ्लेवर्स नक्की ट्राय करून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)
जगभरात सगळीकडे खूप प्रसिद्ध आहेत मार्टिनीचे 'हे' फ्लेवर्स
जगभरात सगळीकडे प्रसिद्ध असलेले मार्टिनी म्हणजे व्होडका मार्टिनी. व्होडका मार्टिनी बनवण्यासाठी व्होडक्याचा वापर केला जातो. काही लोकप्रिय व्होडका मार्टिनी पेयांमध्ये स्ट्रेट व्होडका मार्टिनी, डर्टी मार्टिनी आणि गिब्सन यांचा समावेश आहे.
क्लासिक मार्टिनी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. जिन आणि ड्राय व्हर्माउथपासून बनवलेले हे पेय सगळ्यांचं प्यायला खूप जास्त आवडते. ड्राय मार्टिनी, वेट मार्टिनी आणि परफेक्ट मार्टिनी या तीन प्रकारे ती क्लासिक मार्टिनी बनवू शकता.
ज्यांना वोडका किंवा इतर कोणतेही पेय प्यायला आवडत नाहीत, अशांसाठी लीची मार्टिनी, डाळिंब मार्टिनी आणि इतर फ्रूटी मार्टिनी उत्तम पर्याय आहेत. हे मार्टिनी वेगवेगळ्या फळांच्या ताज्या रसांपासून बनवले जाते.
डेझर्ट मार्टिनी ही एक कॉकटेल आहे,ज्याची चव मिश्र चवींसारखी लागते. हे तयार करताना त्यात चॉकलेट आणि व्हॅनिला सारखे गोड पदार्थ वापरले जातात. त्यातील सगळ्यात लोकप्रिय मार्टिनी म्हणजे एस्प्रेसो मार्टिनी आणि चॉकलेट मार्टिनी.
ब्लू बेरी मार्टिनी चवीला अतिशय सुंदर लागते. पॅशनफ्रूट मार्टिनी, काकडी मार्टिनी आणि टरबूज मार्टिनी इत्यादी मार्टिनी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.