वय वाढल्यानंतर हळूहळू त्वचेमधील कोलेजन कमी होऊन जाते. त्वचेमधील कोलेजन कमी झाल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि कोलेजन वाढवण्यासाठी स्किन बोटॉक्स किंवा इतरही वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. मात्र या ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळच त्वचा अतिशय सुंदर दिसते. कोलेजन वाढवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या सप्लिमेंट्सचे सेवन करतात. मात्र सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी या फळांचे नियमित सेवन केल्यास कोलेजन वाढण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य – istock)
'या' फळांमध्ये सप्लिमेंट्सपेक्षा आहे जास्त कोलेजन
विटामिन सी युक्त आवळ्याचे नियमित सेवन केल्यास त्वचेला अनेक फायदे होतात. शरीरात निर्माण झालेली कोलेजनची कमतरता भरून काढण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. विटामिन सी शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढून त्वचा अधिक तरुण ठेवण्यासाठी मदत करते.
किवीमध्ये विटामिन सी तसेच अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या फळाचे सेवन केल्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. किवी फळ कोलेजनचे विघटन रोखते आणि त्वचेमध्ये ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत करते.
पपईमध्ये विटामिन सी, विटामिन ए आणि एन्झाईम्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित पपईचे सेवन केल्यास त्वचेवर वाढलेली डेड स्किन निघून जाऊन त्वचा स्वच्छ होईल.
संत्र्यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि इतरही आवश्यक घटक आढळून येतात. त्वचेवर आलेले काळे डाग, सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. पेरूमध्ये खूप जास्त फायबर असते. या फळाच्या सेवनामुळे त्वचेची लवचिकता कायम टिकून राहते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.