भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनवले जाणारे पदार्थ जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बिर्याणी. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बिर्याणी खायला खूप आवडते. बिर्याणीचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी तुम्ही बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भरतील प्रसिद्ध बिर्याणीबद्दल सांगणार आहोत. या बिर्याणी जगभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
भारतमध्ये प्रसिद्ध आहेत 'या' खास नवाबी बिर्याणी!
तामिळनाडूतील अंबूर शहरात कमीत कमी मसाल्यांचा वापर करून अंबर बिर्याणी तयार केली जाते. ही बिर्याणी तयार करता चिकन आधी शिजवले जाते. नंतर कोरड्या मसाल्यांचा वापर आणि आंबटपणा येण्यासाठी इतर मसाले वापरले जातात.
केरळमध्ये प्रसिद्ध असलेली बिर्याणी म्हणजे मलबारी बिर्याणी. काळी मिरी, नारळाचे दूध आणि तळलेले कांदे वापरून बिर्याणी बनवली जाते. त्यानंतर चिकन शिजवून भाताचा लेयर तयार करून बिर्याणी बनवली जाते.
कोलकत्यामध्ये बनवली जाणारी बिर्याणी जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. उकडलेले बटाटे, चिकन आणि थोडा गोड चवीचा भात वापरून कोलकत्ता बिर्याणी तयार केली जाते. याशिवाय ही बिर्याणी बनवताना केवड्याच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने केला जातो.
नवाबांच्या लखनौ शहरात अवधी बिर्याणी प्रसिद्ध आहे. ही बिर्याणी बासमती तांदूळ आणि चिकन शिजवून तयार केली जाते. याशिवाय चिकन शिजल्यानंतर भाताचे लेयर करून बिर्याणी पुन्हा एकदा शिजवली जाते.
हैदराबादमध्ये बनवलेली जाणारी हैदराबादी बिर्याणी जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. मुघलाई आणि तेलंगणा शैलीचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो. ही बिर्याणी तयार झाल्यानंतर तिला काहीवेळा कोळश्याचा वापर करून दम दिला जातो. यामुळे या बिर्याणीला स्मोकी टेस्ट येते.