तरुणांना गाड्यांविषयी एक विशेष आकर्षण असते. स्पोर्ट्स कार्स म्हणजे तरुणांसाठी जीव की प्राण! जगभरात अशा अनेक स्पोर्ट्स कार्स आहेत. परंतु, काही मोजक्या कंपन्यांच्या गाड्या तरुणांच्या हृदयावर अधिपत्य गाजवत आहेत. मग ती BMW असो वा Porsche, Ferrari असो वा Mercedese हे नावे तर तरुणांच्या हृदयावर सुवर्ण अक्षरांनी कोरले आहेत.
फोटो सौजन्य - Social Media
BMW M2 या स्पोर्ट्स कारमध्ये 3.0-लिटर, इनलाइन-6 टर्बोचार्ज्ड इंजिन आहे, जे 460 हॉर्सपॉवर (338 किलोवॅट) निर्माण करते. ही कार 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 4.1 सेकंदांत (स्वयंचलित गिअरबॉक्ससह) गाठते.
Porsche 911 ही क्लासिक स्पोर्ट्स कार 3.0-लिटर ट्विन-टर्बो फ्लॅट-सिक्स इंजिनसह येते, जे मॉडेलनुसार 379 ते 640 हॉर्सपॉवरपर्यंतची शक्ती निर्माण करते. उत्कृष्ट हँडलिंग, अचूक ब्रेकिंग आणि Porsche चे आयकॉनिक एअरोडायनॅमिक डिझाइन यामुळे ही कार अनेकांच्या स्वप्नातील गाडी आहे.
2024 Chevrolet Corvette या अमेरिकन सुपरकारमध्ये 6.2-लिटर V8 इंजिन आहे, जे 490 हॉर्सपॉवर आणि 630Nm टॉर्क निर्माण करते. झीरो-टू-100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी तिला केवळ 2.9 सेकंद लागतात, त्यामुळे ती जगातील सर्वात वेगवान स्पोर्ट्स कारपैकी एक मानली जाते.
Ferrari 296 GTB ही हायब्रिड स्पोर्ट्स कार 3.0-लिटर V6 टर्बोचार्ज्ड इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने एकूण 819 हॉर्सपॉवर निर्माण करते. अवघ्या 2.9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठणारी ही कार फेरारीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
Ferrari Roma 3.9-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन असलेल्या या लक्झरी स्पोर्ट्स कारमध्ये 612 हॉर्सपॉवरची ताकद आणि 760Nm टॉर्क आहे. ती फक्त 3.4 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते आणि तिचे स्टायलिश डिझाइन Ferrari च्या क्लासिक आणि मॉडर्न लुकचा उत्तम मेळ साधते.