कधी कुणाचा कसा मृत्यू होईल ते सांगता येत नाही. तुम्ही आजवर अपघातमुळे, कोणत्या आजारामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांचा मृत्यू झालेला पाहिला असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही वनस्पती, फळ आणि फुलांविषयी माहिती सांगत आहोत, ज्यांना हात लावताच तुमचा मृत्यू होऊ शकतो. २०१४ मध्ये अशीच एक घटना घडून आली, ज्यात ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या एका माळीचा धोकादायक वनस्पतीला हात लावल्याने मृत्यू झाला. या वनस्पतीचे नाव अकोनिटम आहे, ज्याला लोक लांडग्याचा शत्रू, सैतानाचे शिरस्त्राण आणि विषाची राणी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. ही जगातील सर्वात प्राणघातक वनस्पतींपैकी एक मानली जाते कारण ती हृदयाचे ठोके कमी करते आणि मृत्यूला खुले आमंत्रण देते.
जगातील ती फळे, फुले आणि वनस्पती ज्यांना हात लावताच तुम्ही पोहचाल मृत्यूच्या दारी
या वनस्पतीचे मूळ सर्वात विषारी आहे, परंतू त्याच्या पानांमध्ये देखील विष असते. यात असलेले न्यूरोटॉक्सिन मेंदूवर परिणाम करते. याचे विषारी स्वरुप इतके तीव्र आहे की, त्वचेच्या संपर्कात येताच मुंग्या येणे, आखडणे आणि बधीरपणा अशा समस्या निर्माण येऊ शकतात. जर कुणी चुकूनही याचे सेवन केले तर उलट्या आणि जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात
हॉगवीड ही एक वनस्पती आहे जी मानवांसाठी धोकादायक ठरू शकते. जर ते त्वचेच्या संपर्कात आले आणि नंतर सूर्यप्रकाशात आले तर चिडचिड आणि जळजळ यासारखी लक्षणे दिसू लागतात. तथापि, गाजर, लिंबू आणि सेलेरी सारख्या काही इतर वनस्पतींमध्ये असे घटक असतात जे चुकीच्या परिस्थितीत खाल्ल्यास तोंडावर फोड येऊ शकतात
अशीच आणखी एक विषारी वनस्पती म्हणजे मॅन्चिनील, जी फ्लोरिडा आणि कॅरिबियन बेटांवर आढळून येते. या वनस्पतीला स्पर्श करणे धोकादायक मानले जाते, ज्यामुळे त्याच्या जवळ चेतावणी फलक देखील लावले जातात. जर कोणी पावसात या झाडाखाली उभे राहिले तर पानांवरून पडणारे थेंब देखील त्वचेलाही हानी पोहोचवू शकतात. एवढेच नाही तर जर हे झाड जाळले तर त्याचा धूरदेखील आपल्या डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम करू शकतो आणि यामुळे श्वास घेण्यास त्रासही होऊ शकतो
जरी मॅन्चिनील या वनस्पतीला स्पर्श केल्याने थेट मृत्यू होत नसला तरी त्याचे छोटे फळ, ज्याला स्पॅनिशमध्ये मृत्यूचे छोटे सफरचंद म्हणतात, ते खाल्ल्यास ते प्राणघातक ठरू शकते. हे खाल्ल्याने शरीरातील सर्व पाणी उलट्या आणि जुलाबाद्वारे बाहेर पडते, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ ओढावला जाऊ शकतो
टीप - ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून यात कोणत्याही तथ्यांची पुष्टी करण्यात आलेली नाही.