शरीरात आवश्यक घटकांची पातळी संतुलित असणे आवश्यक आहे, अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. मात्र शरीरात सतत काहींना काही बदल होतात. अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे शरीरात अनेक बदल होऊ लागतात. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि झोपेच्या समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली मॅग्नेशियमची कमतरता निर्माण भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – iStock)
मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
ब्लॅकबेरीची केवळ चवच नाहीतर हे फळ आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी आवश्यक आहेत.
पपईमध्ये मॅग्नेशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. रोजच्या आहारात पपईचे नियमित सेवन केल्यास पचनाची समस्या उद्भवणार नाही.
किमतीने महाग असलेले अंजीर आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे नियमित भिजवलेले किंवा ओले अंजीर खावेत.
अॅव्होकॅडो खाल्यामुळे शरीरात निरोगी चरबीचे प्रमाण वाढते. याशिवाय मॅग्नेशियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
दैनंदिन आहारात नियमित २ केळी खावीत. कारण यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरासाठी आवश्यक आहे. नियमित केळी खाल्यामुळे पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.