• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Wwiii Fears Us Uk Prepare With 25 Year Food Stock Bunkers

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

Third World War : जगात अण्वस्त्रांचा धोका वाढत असताना, काही पाश्चात्य देशांनी आजपासूनच त्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिका-ब्रिटनमध्येतर २५ वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारीही सुरु आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 16, 2025 | 12:40 PM
WWIII fears US-UK prepare with 25-year food stock bunkers

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? २५ वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Third World War : जगात पुन्हा एकदा अण्वस्त्रांच्या सावटाचे गडद ढग जमू लागले आहेत. तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत असल्याच्या भीतीने पाश्चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमधील लाखो नागरिक आजपासूनच युद्ध, अणुहल्ला किंवा मोठ्या आपत्तींसाठी तयारी करत असल्याचे वृत्त Daily Mail आणि New York Post ने दिले आहे. युद्धाचे ढग अजून फक्त आकाशात आहेत, पण लोक मात्र जमिनीखाली उतरत आहेत. ब्रिटनमधील अनेक लोक आपल्या घरांच्या तळघरात बंकर उभारू लागले आहेत. या बंकरमध्ये पाणी, औषधे आणि कॅन केलेले अन्नसाठे ठेवले जात आहेत. सर्वाधिक मागणी आहे ती २५ वर्ष टिकणाऱ्या मांसाच्या कॅनची. काही नामवंत व्यक्तिमत्त्वे देखील या गुप्त तयारीत सामील झाल्याचे वृत्त आहे.

‘प्रीपर्स’ म्हणजे कोण?

युद्ध, भूकंप, महामारी किंवा अणुहल्ला यांसारख्या आपत्तीपूर्वीच जी मंडळी पुरेपूर तयारी करून ठेवतात त्यांना ‘प्रीपर्स’ म्हटले जाते. ब्रिटनमध्ये या प्रीपर्सचे सोशल मीडिया ग्रुप झपाट्याने वाढत आहेत. तब्बल २३ हजारांहून अधिक लोक असे ग्रुप जॉइन करून एकमेकांना टिप्स देत आहेत. हे लोक केवळ अन्नसाठा नाही, तर पोटॅशियम आयोडाइडच्या गोळ्याही मोठ्या प्रमाणावर गोळा करत आहेत. या गोळ्या रेडिएशन शोषून घेऊन थायरॉईड ग्रंथीचे संरक्षण करतात आणि अणुहल्ल्यानंतरही जगण्याची शक्यता वाढवतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

अमेरिकेत तयारी कितपत?

अमेरिकेत परिस्थिती आणखी गंभीर भासत आहे. २०२३ मधील सर्वेक्षणानुसार, तब्बल २ कोटी नागरिक युद्धासाठी तयार आहेत, तर ५१ टक्के लोकांना अणुहल्ला किंवा मोठ्या विनाशाची शक्यता वाटते. अलीकडेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नानंतरही बंकर आणि सर्व्हायवल किटची मागणी प्रचंड वाढल्याचे द न्यू यॉर्करला सर्व्हायकल रिट्रीटचे संस्थापक ड्रू मिलर यांनी सांगितले.

तयारीत नेमके काय असते?

स्मिथ नावाच्या एका तरुणाने सांगितले की, त्याने आपल्या बंकरमध्ये सोलर पॅनल, सॅटेलाइट फोन, सोलर क्रॅंक रेडिओ आणि वर्षभर पुरेल एवढा अन्नसाठा ठेवला आहे. त्याच्या मते, ही तयारी केवळ जागतिक युद्धासाठीच नव्हे तर अचानक नोकरी जाणे, नैसर्गिक आपत्ती किंवा दीर्घकालीन वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या प्रसंगांसाठीही महत्त्वाची आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य

का वाढली आहे ही भीती?

युक्रेन-रशिया युद्धानंतर जगात अण्वस्त्रांचा धोका अधिकच वाढला आहे. रशियाच्या अण्वस्त्र साठ्याचे इशारे, मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि पाश्चात्त्य देशांचे युद्धसज्ज हालचाली या सगळ्यांमुळे सामान्य नागरिकही अस्वस्थ झाले आहेत. परिणामी, युद्ध अजून सुरू झाले नसले तरी मानसिक महायुद्ध जगभर सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. आज परिस्थिती अशी आहे की, युद्ध कधी सुरू होईल हे कुणालाच माहीत नाही. पण जर ते सुरू झालेच, तर कमीत कमी अमेरिका आणि ब्रिटनमधील लाखो प्रीपर्स स्वतःसाठी जगण्याची तयारी आधीच करून बसलेले असतील.

Web Title: Wwiii fears us uk prepare with 25 year food stock bunkers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • America
  • Great Britain
  • international politics
  • third world war

संबंधित बातम्या

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत
1

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?
2

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

Trump Putin Meeting: ‘पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये…’ पुतिन यांचे ट्रम्पला थेट निमंत्रण; युक्रेन युद्धावर गरमागरम चर्चा
3

Trump Putin Meeting: ‘पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये…’ पुतिन यांचे ट्रम्पला थेट निमंत्रण; युक्रेन युद्धावर गरमागरम चर्चा

‘युक्रेन युद्ध संपवले तर Trump…’ नोबेल स्वप्नाकडे ट्रम्पचे पाऊल? हिलरींच्या विधानाने वाढली उत्सुकता
4

‘युक्रेन युद्ध संपवले तर Trump…’ नोबेल स्वप्नाकडे ट्रम्पचे पाऊल? हिलरींच्या विधानाने वाढली उत्सुकता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

‘आम्ही कमी टॅलेंटेड आहोत का?’…’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री, प्रश्नांची केली सरबत्ती

‘आम्ही कमी टॅलेंटेड आहोत का?’…’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री, प्रश्नांची केली सरबत्ती

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Ambedkar National Memorial : पुण्यात भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन; आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी आक्रमक

Ambedkar National Memorial : पुण्यात भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन; आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी आक्रमक

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.