निरोगी आरोग्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन असणे आवश्यक आहे. मात्र शरीरात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी इत्यादी आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. हिमोग्लोबिन शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. हिमोग्लोबिन आपल्या शरीरात रक्ताद्वारे ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन आढळून येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या फळाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळांचे सेवन
द्राक्षांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेले विटामिन सी आणि लोह हिमोग्लोबिनची पातळी वाढवते. द्राक्षांच्या रसाचे सेवन केल्यामुळे अशक्तपणा कमी होतो.
पेरूचे सेवन केल्यामुळे शरीरात विटामिन सी वाढते. यासोबतच शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते. वाढवण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास पेरूचे सेवन करणे अतिशय प्रभावी ठरेल.
डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि प्रथिने इत्यादी अनेक घटक बाहेर प्रमाणात आढळून येतात. याशिवाय डाळिंबाचा रस किंवा डाळिंबाचे दाणे खाल्यामुळे रक्तातील लोह वाढते आणि सतत येणारी चक्कर, अशक्तपणा इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.
आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमित एक सफरचंद खावे, असा सल्ला डॉक्टर देतात. सफरचंद खाल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. याशिवाय सफरचंद लोह शोषून घेते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असतात. कलिंगड खाल्यामुळे शरीरात थंडावा राहतो. यासोबतच हिमोग्लोबिनची कमतरता सुद्धा भरून निघते.