जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात कोणतीही गंभीर लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. यामुळे धोकादायक आजारांपासून शरीराचा बचाव होतो. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अनेक संकटाना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या हानिकारक पेशींमुळे शरीराचे नुकसान होऊ नये, यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
कॅन्सरपासून शरीराचा बचाव करण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळांचे सेवन
चवीला आंबट गोड असलेली किवी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. किवी खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीराची पचनसंस्था सुधारते आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंब खावे. यामुळे शरीरातील कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे रोजच्या आहारात डाळिंबाचे सेवन करावे.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लाल, काळी आणि हिरवी द्राक्ष खायला खूप आवडतात. द्राक्ष खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले घटक शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू देत नाहीत.
कॅन्सरच्या हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून आहारात जांभूळ, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी इत्यादी बेरीजचे सेवन करावे. यामध्ये असलेले अँथोसायनिन्ससारखे फायटोकेमिकल्स कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात.
सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये फायबर, विटामिन सी आणि विविध अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय नियमित सफरचंद खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.