दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बद्धकोष्ठता होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. आतड्यांची हालचाल न झाल्यामुळे चिडचिड, गॅस, डोकेदुखी आणि थकवा जाणवू लागतो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक संपूर्ण शरीराचे नुकसान करतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कायमच अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात कोणत्याही हेवी पदार्थांचे सेवन करण्याऐवजी सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित या फळांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)
आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा 'ही' चविष्ट फळे

आंबट गोड चवीचे किवी हे फळ शरीरासाठी सुपरफूड मानले जाते. किवी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये फायबर, विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

गोड चवीचे ड्रॅगन फ्रूट खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. यामध्ये भरपूर फायबर असते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ड्रॅगन फ्रूट खावे. यामुळे आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते.

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी इत्यादी बेरिजमध्ये खूप जास्त फायबर आणि विटामिन सी असते. यामुळे आतड्यांमधील मल मऊ होऊन सहज बाहेर पडून जातो. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीर आतून स्वच्छ होते.

सकाळच्या नाश्त्यात नियमित एक सफरचंद खावे. नियमित सफरचंद खाल्ल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांची गती सुधारते आणि बद्धकोष्ठता होत नाही.

आंबटगोड चवीचा पेरू खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पेरूमध्ये असलेले घटक शरीर आतून स्वच्छ करतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोटात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते.






