Moustache Competition: जगभरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यांची मजा लुटली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला भारतात खेळल्या जाणऱ्या अशा एका स्पर्धेविषयी माहिती सांगणार आहोत, ज्याबद्दल वाचूनच तुमचे डोळे चक्रावतील. ही स्पर्धा दुसरी तिसरी काही नसून मिश्यांची स्पर्धा आहे, जी राजस्थानमध्ये आयोजित केली जाते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
क्रिकेट, कबड्डी नाही तर भारतातील 'या' राज्यात ठेवली जाते मिशांची स्पर्धा; अशाप्रकारे ठरवला जातो विजेता
भारतात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकताता आणि यातच आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात विचित्र आणि आश्चर्यकारक स्पर्धेवषयी माहिती सांगत आहोत
ही अनोखी स्पर्धा राजस्थान राज्यातील पुष्कर मेळ्यात आयोजित केली जाते, जिला शान-ए-मिशा स्पर्धा म्हटले जाते
ही स्पर्धा पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून या मेळ्यात सहभागी होतात. वृद्ध आणि तरुण असे सर्वच या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेतात. इथे आलेल्या स्पर्धकांची मिशी फारच लांब असते
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, स्पर्धेत विजेत्याची कशी निवड केली जाते. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, स्पर्धेत ज्याच्या मिशा सर्वात लांब आणि आकर्षक असतात त्याला विजेता घोषित केले जाते
अनेकदा परदेशातूनही लोक या सहभागी होतात. पुष्कर मेळा कार्तिक पाैर्णिमेच्या दिवशी भरतो, जा सहसा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो