मोठ्यांपेक्षा लहान मुलांना स्मार्टफोनची प्रचंड क्रेझ असते. आपण लहान मुलांना शाळेत शिकवणीसाठी स्मार्टफोन घेऊन देतो. पणही मुलं स्मार्टफोनवर सतत रिल्स पाहतात. त्यामुळे मुलांच अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. मुलांच्या आणि पालकांच्या या समस्या लक्षात घेऊन Google ने एक नवं फीचर लाँच केलं आहे.
फोटो सौजन्य - pinterest
सध्याच्या या डिजीटल जगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मोठ्यांपेक्षा लहान मुलांना स्मार्टफोनची प्रचंड क्रेझ असते.
आपण लहान मुलांना शाळेत शिकवणीसाठी स्मार्टफोन घेऊन देतो. पण अशा परिस्थितीत ही मुलं स्मार्टफोनवर सतत रिल्स पाहतात. त्यामुळे मुलांच अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं.
मुलांच्या आणि पालकांच्या या समस्या लक्षात घेऊन Google ने एक नवं फीचर लाँच केलं आहे. स्कूल टाईम असं या फीचरंच नाव आहे. अँड्रॉइड फोन, टॅबलेट आणि सॅमसंग गॅलेक्सी वॉचसाठी हे फीचर लाँच करण्यात आलं आहे.
Google ने या वर्षाच्या सुरुवातीला Fitbit Ace LTE स्मार्टवॉचवर स्कूल टाइम फीचर लाँच केलं होतं. त्यानंतर आता हे फीचर अँड्रॉइड फोन, टॅबलेट आणि सॅमसंग गॅलेक्सी वॉचसाठी देखील उपलब्ध आहे.
Google चं हे फीचर पालकांना त्यांच्या मुलांच्या फोन किंवा स्मार्ट वॉचवर शाळेच्या वेळेत लिमिटेड फंक्शनॅलिटीसह एक डेडिकेटेड होम स्क्रीन सेट करण्यासाठी परवानगी देतात.
मुलांना शाळेच्या वेळेत कोणते ॲप्स ऍक्सेस करता येतील याचा निर्णय पालक घेऊ शकतात. या कालावधीत, मुलं फक्त मुख्य संपर्कांना कॉल किंवा एसएमएस करू शकतात.