मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चंदनाच्या पावडरचा वापर केला जात आहे. चंदन पावडर चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग घालवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला, मुली डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. पण हे उपाय करण्याऐवजी आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या चंदन पावडरचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला चंदन पावडर त्वचेला लावल्यामुळे चेहऱ्यावर नेमके काय बदल दिसून येतात? याचे त्वचेला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
त्वचेसाठी वरदान ठरेल आयुर्वेदिक गुणधर्मांचे चंदन!
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या चंदनाचे पान, फुल, खोड सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. प्रत्येक घरात धार्मिक कार्यांमध्ये चंदन पावडरचा किंवा चंदनाचा वापर केला जातो.
वाटीमध्ये चंदन पावडर घेऊन त्यात गुलाबी पाणी मिक्स करा. तयार करून घेतलेला लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टमध्ये चंदन आढळून येते. चंदनाचा वापर केल्यामुळे प्रॉडक्टला अतिशय सुंदर सुगंध येतो. फेसपॅकमध्ये मोठ्या प्रमाणात चंदन वापरले जाते.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेमध्ये जळजळ होऊ लागते. त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी चंदनचा लेप बनवून चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचा कायम थंड राहील.
चंदनामध्ये अँण्टीसेफ्टीक गुणधर्म आढळून येतात. यामुळे चेहऱ्यावर आलेले मुरूम आणि पिंपल्सचे डाग कमी होऊन जातात. याशिवाय धूळ , मातीमुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण स्वच्छ होते.