निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. कोणत्याही एका विटामिनची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचू लागते. शरीरातील अतिशय महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी १२. या विटामिनच्या कमतरतेमुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ वाढवण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या मसाल्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या मसाल्यांच्या सेवनामुळे मेंदू आणि नसांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
Vitamin-B12 च्या कमतरतेमुळे शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी आहारात करा 'या' मसाल्यांचे वापर
दालचिनीमध्ये पॉलीफेनॉल नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. याशिवाय दालचिनीच्या काढ्याचे सेवन केल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तसेच जळजळ कमी होऊन तात्काळ आराम मिळेल.
स्वयंपाक घरातील अतिशय प्रभावी मसाला म्हणजे जिरं. जेवणात फोडणी देण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातो. शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ कमतरता भरून काढण्यासाठी जिऱ्याचे सेवन करावे.
प्रत्येक घरात लवंग ही असतेच. लवंगाच्या सेवनामुळे शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
जवसाच्या बिया दह्यामध्ये मिक्स करून खाल्यास शरीरात वाढलेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघेल. याशिवाय तुम्ही जवसाच्या बियांपासून बनवलेल्या लाडूचे किंवा इतर पदार्थांचे सुद्धा सेवन करू शकता.
काळीमिरी मसाला चवीला अतिशय तिखट असतो. त्यामुळे मसाल्यांचे पदार्थ बनवताना काळीमीरीचा वापर केला जतो. सकाळी उठल्यानंतर काळीमिरीच्या काढ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.