नुकताच रिलीज झालेला 'भूल भुलैया 3' चित्रपट सध्या फार चर्चेत आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विद्या बालन या सुप्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. आपल्या कारकिर्दीत दोन्ही अभिनेत्रींनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोन्ही अभिनेत्री चित्रपटाची फी कोटींमध्ये घेतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठी कोणत्या अभिनेत्रींने सर्वाधिक मानधन घेतले आहे? नाही, तर मग जाणून घ्या.
विद्या बालन की माधुरी दीक्षित? 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठी कोणी घेतले सर्वाधिक मानधन
'भूल भुलैया 3' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसह माधुरी दीक्षित आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत असणार आहेत
मागेच या चित्रपटातील 'अमी जे तोमर' 'अमी जे तोमर' हे गाणं रिलीज झालं. यात दोंन्ही अभिनेत्री नृत्याविष्कार सादर करताना दिसून येत आहेत
विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांच्या चित्रपटांची फी ही कोटींमध्ये असते
विद्या बालन याआधी चित्रपटाच्या पहिल्या भागात दिसून आली होती त्यांनतर आता ती थेट तिसऱ्या भागात दिसून येत आहे. माधुरी दीक्षित मात्र पहिल्यांदाच पहिल्यांदाच 'भूल भुलैया 3'मध्ये दिसणार आहे
दोन्ही अभिनेत्री एकत्रच एका चित्रपटात असल्याकारणाने कोणी सार्वधिक फी घेतली असावी याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे
तर रिपोर्ट्सनुसार, भूल भुलैया 3' चित्रपटासाठी विद्या बालनने 8 ते 10 कोटी रुपये फी घेतली आहे. तर माधुरी दीक्षितने 5 ते 8 कोटी रुपये फी घेतली आहे.