लग्न म्हंटल की दोन ते तीन महिने आधीपासूनच साडी, लेहंगा इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. लग्नसराईच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना सुंदर नटून थटून तयार व्हायला खूप आवडतं,. साडी नेसल्यानंतर त्यावर मॅच होतील असे सोनं, मोती, हिरे इत्यादी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने परिधान केले जातात. महिला हिऱ्याचे स्टोन वर्क केलेले दागिने परिधान करायला खूप आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नसराईच्या दिवसांमध्ये स्टोन वर्क केलेल्या नेकलेसच्या काही सुंदर आणि उठावदार डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्सचे दागिने लग्नात नक्की परिधान करून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नसराईत साडी किंवा घागऱ्यावर परिधान करा स्टोन वर्क नेकलेस
लग्नामध्ये साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर तुम्ही या पद्धतीचा सुंदर नेकलेस परिधान करू शकता. बाजारामध्ये हिऱ्यांचे दागिने अगदी ५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
कोणत्याही डार्क रंगाची हेवी साडी परिधान केल्यानंतर रंगीत डायमंड असलेला नेकलेस घातल्यास तुमचा लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसेल. हिऱ्यांच्या नेकलेसमध्ये तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार हिरे कस्टमाइज करू शकता.
लग्नात काहींना साडी किंवा लेहंगा घातल्यानंतर हेवी लुक हवा असतो. त्यामध्ये तुम्ही गळ्याभोवती स्टोन वर्क केलेला नेकलेस घालू शकता. यामुळे लग्नात तुमची शोभा वाढेल.
न वर्क, थ्रेड वर्क केलेल्या साडी किंवा लेहंग्यावर तुम्ही या पद्धतीचा सुंदर नेकलेस परिधान करू शकता. या पद्धतीच्या नेकलेसमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या हिऱ्यांचा वापर केला जातो.
लेहेंगा किंवा घागरा परिधान केल्यानंतर त्यावर तुम्ही या डिझाइन्सचे नेकलेस परिधान करू शकता. यामुळे तुमचा गळा भरलेला दिसेल. हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाचे दागिने उपलब्ध आहेत.