भारतीय महिलांचा पारंपरिक पोशाख साडी आहे. सणावाराचे दिवस, घरातील कार्यक्रम इतर प्रत्येक दिवशी महिला कायमच साडी नेसताना. मागील अनेक शतकांपासून भारतातील स्त्रिया साडी नेसत आल्या आहेत. दरवर्षी सगळीकडे २१ जागतिक साडी डे साजरा केला जातो. पण ज्याकाळी साडी अस्तित्वात आली नव्हती, तेव्हा महिला कोणते वस्त्र परिधान करत होत्या? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. चला तर जाणून घेऊया पारंपरिक भारतीय साडीचा इतिहास? साडी अस्तित्वात येण्याआधी महिला कोणते वस्त्र परिधान करायच्या? (फोटो सौजन्य – istock)
पारंपरिक साडीचा शोध लागण्याआधी महिला कोणते वस्त्र परिधान करायच्या?

साडी हे पारंपरिक वस्त्र आहे. सिंधू सभेमध्ये साडीसारख्या वस्त्राचा संदर्भ इसवी सनपूर्व 2,800 ते 1800 वर्षांपासूनचा आहे. बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये साडी नेसण्याची पद्धत वेगळी आहे.

साडी वस्त्र अस्तित्वात येण्याची आधी सुद्धा महिला कपडे परिधान करायच्या. सिंधू महिला कायमच सुती कपडे परिधान करत होत्या. त्यांच्या अंगाभोवती कायमच सुती कापड गुंडाळलेले असायचे.

मौर्य आणि गुप्त काळात महिलांच्या वस्त्र परिधान करण्याच्या पद्धतीत अनेक नवनवीन बदल होत गेले. महिला वस्त्र तयार करताना नैसर्गिक रंगांचा वापर करत होत्या. तसेच वस्त्रांवर हातांवर छपाई केली जायची. इजिप्तमध्ये महिला लांब वस्त्र परिधान करायच्या.

ईजिप्तमधील महिलांचे कपडे प्रामुख्याने सिल्क किंवा लिननचे असायचे. या महिलांचे कपडे अतिशय साधे असतात. पण कालांतराने भारतीय महिलांच्या पोशाखात अनेक बदल होत गेले.

पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिला कोणत्याही कार्यक्रमात जाताना साडी नेसून जातात. साडीमुळे लुक अतिशय खुलून दिसतो.






