आपण अनेकदा ही गोष्ट ऐकली असेल किंवा वडिलधाऱ्यांनी तुम्हाला सल्ला दिलाअसेल की, कधीही मेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये, मग त्या व्यक्तीने आपल्याला कितीही दुःख दिले असले तरीही... शास्त्रातही हेच सांगण्यात आले आहे पण यामागील मूळ कारण काय ते तुम्हाला माहिती आहे का? चला मृत व्यक्तीविषयी वाईट बोलल्याने आपल्या आयुष्यात काय घडते ते जाणून घेऊया.
मृत व्यक्तीची निंदा केल्याने काय होते? शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या

असे म्हणतात की, मृत व्यक्ती आपल्या सोबत नसला तरी त्याच्याशी असलेले आपले कर्माचे नाते मात्र सक्रिय राहते. जर आपण त्यांच्यावर टीका केली किंवा हसलो तर त्याच्याशी आपले भावनिक नाते टिकून राहते.

हिंदू धर्मशास्त्र ग्रंथ मनस्मृतीनुसार, कोणाचीही निंदा करणे हा गंभीर गुन्हा आहे विशेषत: मृत व्यक्तीची थट्टा करणे किंवी त्याच्याविषयी वाईट बोलणे. प्राचीन ग्रथांमध्ये याची उदाहरणेही नमूद केली आहेत.

महाभारतातील शांती पर्वामध्येही युधिष्ठिरने भीष्म पितामहांकडून हाच धडा शिकला की चुकूनही मृत व्यक्तीचा अपमान करू नये. असं केल्याने आपल्या उर्जेवर नकारात्मक परिणाम होऊ लागतो.

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वाईट बोलणे भ्याडतेचे लक्षण मानले जाते. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वाईट बोलून आपण आपली मानसिकता दर्शवतो.

प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण असतात. मृत्यूनंतर फक्त वाईट गुणांची गणना करणे हे एक अपूर्ण सत्य आहे. प्रत्येत धर्म हेच शिकवतो की, मृत व्यक्तीची कधीही निंदा करु नये.






