भारतातील सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. भारतात सोन्यातच्या दरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे भारतीय नागरिक भारतात सोनं खरेदी करण्यापेक्षा दुबईत सोनं खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात. बरेचदा दुबईला जात असशील तर सोनं घेऊन ये असं वाक्य तुमच्याही कानावर पडत असेल. दुबईत नक्कीच सोनं स्वस्त आहे. पण ते आपल्या देशात घेऊन येण्यासाठी नक्की किती मर्यादा आहे आणि कशा पद्धतीने घेऊन येऊ शकता जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
भारतीय व्यक्ती दुबईमधून किती सोनं आणू शकतो? काय सांगतात नियम, जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
भारतात सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यासाठी सोनं आयात केले जाते. भारतातील सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे भारतीय नागरिक दुबईतून सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
लोक दुबईतून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करून भारतात आणतात. भारतात सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यासाठी सोने आयात केले जाते. मात्र, दुबईहून भारतात सोने आणण्यास मर्यादा आहेत. मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणण्यासाठी शुल्क आकारलं जातं.
भारतात सणासुदीच्या आणि लग्नाच्या काळात सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ होते. दुबईत सोन्याची किंमत भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारताच्या तुलनेत दुबईत सोने स्वस्त असण्याचे कारण म्हणजे आयात शुल्क. भारतात सोनं आयात करताना शुल्क भरावे लागते. तर दुबईत सोन्यावर आयात शुल्क आकारलं जात नाही.
File Photo : Gold
जर कोणी दुबईहून या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणलं तर आयात शुल्क भरावे लागेल. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणले आहे.
भारतात, सोन्यावर GST, आयात शुल्क, उपकर आणि TDS सारखे अनेक कर आकारले जातात. दुबईतून सोने खरेदी करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे येथे सोने आंतरराष्ट्रीय दरात उपलब्ध आहे.