Wine Vs Champagne : आनंदाचा क्षण असो वा दु:खाचा अनेकांना ड्रिंक करायला फार आवडतं आणि यातीलच लोकप्रिय ड्रिंक्स म्हणजे वाईन आणि शॅम्पेन! अनेकांना या दोघांमधील फरक फारसा माहिती नसतो ज्यामुळे लोक याला एकच मनातात पण असे नाही. वाईन आणि शॅम्पेनमध्ये फार तफावत आहे... चला तर मग त्यांच्यातील काही बारीक फरक जाणून घेऊया.
वाईन आणि शॅम्पेनमध्ये काय फरक आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर...
वाईन आणि शॅम्पेनमधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फरक म्हणजे फ्रान्समधील शॅम्पेन शहरात बनवली जाणारी शॅम्पेनच खरी शॅम्पेन म्हणून ओळखली जाते. जर तुम्ही शॅम्पेन खरेदी केली तर त्याच्या लेबलवर ती कुठे बनवली आहे ते मेन्शन केले जाते. जर ती फ्रान्सच्या शहराबाहेर बनवली गेली असेल तर तिला शॅम्पेन म्हणता येणार नाही. तिला म्हटलं जाईल वाईन.
वाईन असो किंवा शॅम्पेन दोन्ही बनवण्यासाठी द्राक्षांचा वापर केला जातो. पण यातही बारीक फरक येतोच, फ्रान्समधील शॅम्पेनमध्ये सामान्यतः पिकवलेल्या त्या द्राक्षांचा वापर केला जातो ज्यांना शॅम्पेन शहरात उगवले आहे. याउलट वाईन बनवण्यासाठी द्राक्षांच्या अनेक प्रजातींचा वापर केला जातो आणि त्यात शॅम्पेन शहरातील द्राक्षांचा समावेश नसतो.
शॅम्पेन तयार करण्यासाठी, ते एका मोठ्या टाकीत ठेवले जाते आणि फर्मेंटेशन प्रक्रियेतून याला तयार केले जाते. यानंतर, तीच प्रक्रिया पुन्हा केली जाते, पण यावेळी ही प्रक्रिया बाटलीत केली जाते. यानंतर, ते १५ महिने साठवले जाते आणि त्यात काही खास गोष्टी मिसळल्या जातात. यानंतर, ते काही महिन्यांसाठी साठवले जाते आणि नंतर विक्रीसाठी पाठवले जाते.
वाईनला मात्र तीन वेळा साठवले जाते. नंतर हे थंड केले जाते आणि मग यात, यीस्ट आणि साखर मिसळली जाते.
वाईनची चव शॅम्पेनपेक्षा थोडी गोड आणि फ्रुटीयर असते. जे लोक ड्राय वाइन पितात ते सहसा शॅम्पेन पसंत करतात. दुसरीकडे, ज्यांना अधिक फ्रुटीयर आणि गोड पेये आवडतात ते स्पार्कलिंग वाईन पिणं पसंत करतात. तथापि, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कोणत्याही स्वरूपात अल्कोहोलचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.