भारतीयांसाठी चपाती ही त्यांच्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. चपातीशिवाय भारतीयांचे जेवण होऊच शकत नाही. चपातीला अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की, पोळी, रोटी किंवा फुलके. मात्र आपल्या आहारात प्रामुख्याने समावेश असणाऱ्या या पदार्थाचा नक्की शोध कधी लागला तुम्हाला माहिती आहे का? नाही... चला तर मग चपातीचा रंजक इतिहास जाणून घेऊयात.
कधी बनवली गेली पहिली चपाती? 14 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास

भारतात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे घराघरात चपातीचे सेवन केले जाते. भारतीय खाद्यसंस्कृतीत चपातीचा प्रामुख्याने समावेश केला जातो. याशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते

रोजच्या आहारात खाल्ल्या जाणाऱ्या चपातीचा शोध कधी लागला तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सर्वात आधी पहिली चपाती ही 14 वर्षांपूर्वी बनवण्यात आली.

आता तुम्हाला वाटत असेल की, भारतीयांनी चपातीचा शोध लावला असावा मात्र असे नाही. थांबा चपातीचा शोध हा उत्तर पूर्व जॉर्डनमधील एका ठिकाणी लागल्याचे समोर आले आहे

काही तज्ज्ञांच्या मते, ते 14 वर्षांपूर्वी उत्तर पूर्व जॉर्डनमधील ठिकाणी बनवण्यात आली होती. तर काहींच्या मते, 5 हजार वर्षांपूर्वी रोटी बनवण्याची पद्धत सुरु झाली. त्याकाळी गव्हाची पेस्ट करून गरम दगडावर रोटी बनवली जायची

तर भाकरीविषयी असे सांगितले जाते की, ती प्रथम पर्शियात बनवण्यात आली. त्यावेळी पिठापासून जाडसर भाकरी तयार केली जायची






