भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये काल सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने कमालीची कामगिरी केली. कुलदीप यादव आता आशिया कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडे आता आशिया कपच्या एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही स्वरूपात ३० पेक्षा जास्त विकेट आहेत. रवींद्र जडेजाने २९ विकेट घेतल्या आहेत.
भारतासाठी सर्वाधिक विकेट आशिया कपमध्ये घेणारे गोलंदाज. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
कुलदीप यादव आता आशिया कपमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत ३१ बळी घेतले आहेत. फोटो सौजन्य - बीसीसीआय
रवींद्र जडेजा हा टी-२० आणि एकदिवसीय आशिया कपच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. जडेजाची राजवट आता तुटली आहे. त्याने आशिया कपच्या इतिहासात एकूण २९ विकेट घेतल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कपमध्ये भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही स्वरूपात एकूण २३ विकेट घेतल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
खूप दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला इरफान पठाण आशिया कपच्या इतिहासात २२ विकेट्ससह यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तो फक्त एकदिवसीय आशिया कपमध्ये खेळला. त्याने १२ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत पाचव्या स्थानावर आहे. आशिया कपच्या इतिहासात त्याने एकूण २२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये नऊ आणि टी-२० आशिया कपमध्ये १३ विकेट्सचा समावेश आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया